राज्यातले महाविकास आघाडीचे सरकार शिवसेनेतील पक्षांतर्गतच्या रुसवा फुगवीमुळे शिवसेना प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विचारा सोड चिठीला जय महाराष्ट्र करून शिव सेनेतील ४६ आमदारानी शिवसेनेतुन थोडक्यात बाहेर पडल्यामुळे राज्यातले महाविकास आघाडीचे सरकार एका दणक्यात कोसळून गेले आणि राज्याचे राजकीय समीकरण गल्ली पासून ते दिल्ली पर्यत ढवळून निघाले हे राजकारणाची दशा ग्रामीण भागात चर्चेचा विषय बनला आहे
ग्रामीण भागातील शहरी भागासह ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच बदलने शक्य होत नाही तर राज्याच्या राजकारणात ४६ शिवसेनेच्या आमदाराने राज्याचे राजकारण बदलून एक नवा राज्यात इतिहास घडवीला खरंच कमाल काय कमाल व धाडस आहे असे जनतेतून बोलल्या जात आहे
दिल्लीचे राजकारण आणि ग्रामीण भागातील गल्लीच्या राजकारणात मोठी तफावत असली तरी खेड्यापाखेड्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत निवडून गेलेला ग्रामपंचायतचा सदस्य कोणत्या ही पदाची अपेक्षा करता पार्टी प्रमुख्याच्या खांद्याला खांदा लावून पाच वर्षाचा काळ यशस्वी रित्या पार करतात तर राज्याच्या राजकारणात कोणत्याही पक्षाचा पक्ष प्रमुख राहूद्या त्यांच्या पक्षाच्या ध्येय धोरनावर निवडून येणारे आमदार असो की खासदार असो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात आणि मूळ पक्षाला राम राम करीत असल्यामुळे राज्यातले वातावरण अचल बिचल होताना दिसत आहे
