Header Ads Widget

रामतीर्थ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांची बदली झाल्याची अफवा तपास कामी नांदेडला ? -


नायगाव फास्ट न्यूज : माधव पवार 

बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या बदलीची नायगाव तालुक्यासह बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात अफवा मोठ्या प्रमाणात होत असताना ऐकावयास मिळत असून सपोनि जाधव हे तपास कामी नांदेडला गेल्याचे समजत असून सदरच्या ठाण्यातुन अफवा जरी बदलीची होत असली तसा प्रकार काही बदलीचा झाला नसल्याचे समजते सपोनि विजय जाधव यांनी शासकीय कामासाठी अर्थात तपास कामी असल्याचे सांगण्यात येत आहे
तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि विजय जाधव यांनी सदरच्या ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर महापुरुषाच्या जयंती बरोबर गणेश उत्सव असो मुस्लिम बांधवांचा धार्मिक सण असो या काळात पूर्ण खबरदारी घेऊन ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पंचेचाळीस गावात शांतता कमिटीच्या बैठका घेऊन धार्मिक सण उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करीत होते आणि धार्मिक सणाच्या काळात कोणी हुल्लडबाजी करत असल्यास त्यांना कायदा काय असते त्यांच्या खाकीतील शक्तीनिश्चित दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
 रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यासाठी ठाण्याचे सपोनि विजय जाधव यांनी काही विलंब न लावता शंकर नगर येथील कारखान्या जवळ खून प्रकरणातील आरोपीला काही दिवसातच जेरबंद केले तसे अनेक गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न रामतीर्थ पोलिसांनी केला असल्यामुळे आजही रामतीर्थ पोलीसांची वचक गुन्हेगारावर असली तरी साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या बदलीची चर्चा मात्र ग्रामीण भागात रंगायला लागली असली तरी सपोनि जाधव हे तपास कामी नांदेडला गेल्याचे सांगण्यात येत आहे