Header Ads Widget

गुत्तेदारासह विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे पावसाळ्यात अशी लागली विद्युत खांबाची वाट शॉक लागलेल्या शेतकऱ्यांना गुत्तेदारानी आर्थिक मदत करावी - उपअभियंता म्हणतात मला घटना कळाली




हिमायतनगर : नागोराव शिंदे : 

हिमायतनगर तालुक्यातील मौजे घारापुर येथील रहिवासी असलेले शेतकरी श्रीराम गणपती शिंदे यांच्या शेतातील गट क्रमांक ८३ यांच्या शेतीतुन विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यानी व गुत्तेदारानी विद्युत खांब रोवली आणि कमी दर्जेचे खडे करून विद्युत खांबे बसल्यामुळे या विभागात पाऊस मोठया प्रमाणात पडत असल्याने जमिनीतुन खांबे रस्त्यावर पडत असल्यामुळे या बाबतीत हलगर्जी पणा गुत्तेदाराचा विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याचा संशोधन करण्याचा असला तरी एका शेतकऱ्यांना जीव गमावण्याची वेळ दिनांक ४ जुलै २०२२ रोज सोमवारी आली होती सुदैवाने शेतकरी बाल बाल बचावले असल्याने शेतकऱ्यांच्या कुटूंबातील नातेवाईकाचा जीव भांड्यात पडला आणि हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे समजते आणि गुत्तेदारानी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे

हिमायतनगर विद्युत वितरणचे उपअभियंता नागेश लोने म्हणतात सदरची घटना मला माझ्या लाईनमनानी कळवली आहे परंतु गुत्तेदारानी तात्काळ विद्युत वितरण खांब उभे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी श्रीराम गणपती शिंदे यांची पत्नी नीलावती श्रीराम शिंदे यांनी केली व गु्तेदार यांच्या बोगस कामाची चौकशी करावी असे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे 
तालुक्यातील घारापुर येथील शेतकरी श्रीराम गणपती शिंदे यांनी मध्यरात्री पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे सदरचा शेतकरी श्रीराम गणपती शिंदे यांना शेतात पडलेल्या खांबातुन विद्युत प्रवाहा चिखलात उतरल्यामुळे शॉक लागला असल्यामुळे हिमायतनगरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते असे आमच्या नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगरचे तालुका प्रतिनिधी नागोराव शिंदे यांनी माहिती दिली आहे  केलेला विद्युत प्रवाह करीत असलेला खांब रात्रीला रस्त्यात पडलेला पाहून यांनी संबंधित विभागाच्या विद्युत वितरण कंपनीच्या लाईनमेनला संपर्क सतत करीत होता व माहिती देण्यासाठी प्रयत्न करीत होता परंतु त्या कर्मचाऱ्यांनी फोन उचलला नसल्यामुळे या भागातील जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे सदरचा शेतकरी आपल्या शेतातील जनावरांची व्यवस्था करण्यासाठी  थोडया फार फरकाने जात होत असे सांगण्यात आले आहे