हिमायतनगर / नागोराव शिंदे
शहरासह तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून सतत धार होत असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील हाजरो हेक्टर शेत जमिनी खरडून जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे त्यातच काही ठिकाणी हा पाऊस वरदान ठरत असल्याचे चित्र सुद्धा काही ठिकाणी दिसून येत असून या परिसरात चार पाच जुलै रोजी झालेल्या रात्रीच्या मुसळधार पावसाने हिमायतनगर शहरातील काठावरील शेतजमिनीत पुराचे पाणी थेट शेतात घुसल्यामुळे कोबं फुटलेल्या (बाळस) धरलेल्या पिकासह प्रचंड पाणी शेतात झाल्याने अनेकांच्या शेतातील कट्टे देखील फुटल्यामुळे अनेकांच्या शेतातील काळी माती वाहून गेली आहे
या पावसाने खरीप पिकांचे सुद्धा प्रचंड नुकसान होऊन हानी झाली आहे हिमायतनगर तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसापासून रात्री मुसळधार पावसाने हजेरी दिल्यामुळे सोयाबीन पिकांचे बियाणे दबल्या गेल्यामुळे येथील शेतकऱ्यानी दुबार पेरणी केल्यानंतर एक जुलैपासून दररोज रिमझिम पावसाने तालुक्यात हजेरी लावल्यामुळे येथील काही शेतकरी समाधान सुद्धा व्यक्त करीत आहेत अशातच तीन जुलै रोजी झालेल्या धुवाधार मुसळधार पावसाने तालुक्यातील नदी काठावरील शेतजमिनी खरडून गेल्याचे येथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटून त्यांचे प्रचंड नुकसान सुद्धा झाले असल्याचे पहायला मिळाले आहे
