. माधव पवार
नायगाव तालुक्यातील घुंगराळा व सावरखेड फाट्या जवळ असलेल्या दारू भट्टी जवळ जीप आणि मोटार सायकलची समोरासमोर टक्कर लागल्यामुळे एक ठार झाले असल्याची घटना कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक १३ जुलै २०२२ रोजी दुपारी चार ते साडे चार वाजण्याच्या दरम्यान घडली असल्यामुळे मोटार सायकलचा चुराडा झाला तर लाल रंगाची जीप खड्यात जाऊन पलटी खाली असल्याचे वास्तव चित्र दिसून येत असून सदरील घटनेचा पंचनामा कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखली बिट जेमादार संतोष कुमरे पॉका अशोक घुमे यांनी केला आहे
वंजारवाडी येथील रहिवासी असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य दिवंगत गणपतराव शामराव कदम यांचे चिरंजिव वसंत गणपतराव कदम वय २९ वर्ष राहणार वंजारवाडी यांचा मोटार सायकल व जीपच्या धडाकेत घुंगराळा येथील सावरखेड फाट्यावर अपघात झाला व नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दिनांक १३ जुलै रोजी संध्याकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्यांच्या पश्चात आई कुसुमबाई गणपतराव कदम, पत्नी सर्तिका वसंत कदम, मुलगा आदर्श वसंत कदम, मुलगी अनुष्का वसंत कदम असा त्यांचा परिवार आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले घुंगराळा ते बळेगाव मार्गावर सदरचा अपघात झाला या अपघातील वंजारवाडी येथील रहिवासी असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य दिवंगत गणपतराव कदम यांचे चिरंजीव मयत... यांनी मोटार सायकलवर वंजारवाडी कडून काही तरी कामानिमित्त घुंगराळा कडे जात होते व घुंगराळा येथून लाल रंगाची जीप क्रमांक एम एच १७ व्ही,३१९, आणि मोटार सायकल क्रमांक एम एच २६ एस,२०७३ या दोघांची अमाने सामने धडक लागल्यामुळे हा सदरचा अपघात झाला मोटार सायकल वरील मयत.. हा प्रथम गंभीर जखमी असल्यामुळे अतिदक्षता मानल्या जाणाऱ्या अंबूलन्सने प्रथम नायगाव अथवा नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे
