Header Ads Widget

नायगाव फास्ट न्यूजच्या दणक्याने सा.बां. वि आ.आली जाग मांजरम ते बेंद्री - नायगाव रत्यावर पडलेला खडा बुजविण्यास सुरवात


. बाळासाहेब पांडे : विशेष प्रतिनिधी नायागांव :

नायगाव तालुक्यातील मांजरम ते बेंद्री नायगाव या रस्ता तालुक्याला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व जवळचा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर मांजरम ते बेंद्री दरम्यान पूल असून या नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह मोठ्या माणात असल्यामुळे अनेक वेळा येथे दुर्घटना घडल्या आहेत त्यामुळे तो खड्डा अपघाताला निमंत्रण देत होता तो खड्डा बुजविण्यासाठी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम उपविभाग या नायागांव यांच्या कडे मागण्या करून ही तो बुजविला नव्हता परंतु नायागांव फास्ट न्यूजच्या माध्यमातून दिनांक १६ जुलै २०२२ रोजी ऑनलाईन बातमी प्रकाशित केल्याच्या नंतर सदरच्या अधिकाऱ्याला जाग आली आणि तो खडा तात्काळ बुजविण्यास सुरुवात केली आहे
तालुक्यातील मांजरम ते बेंद्री नायगाव रस्यावर पडल्या खड्याच्या संदर्भात नायागांव फास्ट न्यूजने दमदार बातमी प्रकाशित केली त्या न्यूजच्या दणक्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायागांवचे अधिकारी खडाडून उठले आणि रस्ता एका दिवसात बुजवायला सुरुवात केल्यामुळे तात्पुरता रस्ता हा नागरिकांना जाण्याची तयार झाला परंतु त्या पुलाच्या आजू बाजूने पुरसन पुराचे अडकले ते सुद्धा बाजूला काढण्याची गरज असून सदरच्या पुलामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून त्यामुळे पुलावर भला मोठा खड्डा पडला होता हा खड्डा कुणीच बुजविण्यास तयार नव्हते परंतु नायगाव फास्ट न्यूजच्या दणक्याने मात्र हा खड्डासार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगावच्या अधिकाऱ्यानी बुजविण्यास सुरुवात केली आहे