Header Ads Widget

ओला दुष्काळ जाहीर करा वंचित बहुजन आघाडी नायगाव यांची तहसीलदाराकडे मागणी -


.      माधव पवार 
नायगाव तालुक्यात सतत रात्रंदिवस होत असलेल्या संतप्त पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, या अस्मानी संकटामुळे शेतकरी हातबल झालेला आहे. शेतकऱ्यांच्या व्याथा सरकारने समजून घेणे गरजेचे आहे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी नायगाव यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे 

तालुका महासचिव मा साहेबराव कोपरेकर तालुका उपाध्यक्ष मा.सतीश वाघमारे , तालुका संघटक मा.बालाजी गायकवाड रातोळीकर, महिलातालुका अध्यक्ष .रेखा देवकर , मुरली भद्रे , दीपक गजभारे घुंगराळेकर, व आदी उपस्थित होते....
संपूर्ण तालुक्यातच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेंव्हा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी पन्नास हजार प्रमाणे आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नायगाव तालुका महासचिव साहेबराव कोपरेकर , यांनी केली आहे नायगाव तालुक्यात सारखा पाऊस सुरू असल्यामुळे सात दिवसापासून सूर्य दर्शन ही झाले नाही.. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री , याना देण्यात आले आहे....