जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रसिद्ध असलेले नरसी गाव हे नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील असून याच गावातून म्हणजे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असल्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश राज्याला जोडला गेला असल्यामुळे या नरसीच्या चौकात जन सामान्य माणसा बरोबर वहानावर व इतर गंभीर बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कसल्याच प्रकारची रास्त सुविधा नव्हती परंतु बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे तत्कालीन कर्तव्य पोलीस निरीक्षण विजय जाधव यांच्या नरसी ग्रामपंचायतche विद्यमान सरपंच गजानन शिवाजीराव पाटील भिलवंडे यांच्या डोळस विचारातील संकल्पना म्हणजे नरसीच्या चौकात अतिशय बारीक गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी सिसिटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था केल्यामुळे आता सिसिटीव्ही कॅमेरे कॅच टू कॅच करणार आहेत
जिल्ह्यातील तालुक्यातील नरसी या गावाकडे गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत लोकांचे लक्ष असल्यामुळे या चौकात बसविण्यात आलेले सिसिटीव्ही कॅमेरे सर्वच बाबीवर लक्ष केंद्रित करणार असल्यामुळे एकदरीत पोलिसांच्या डोक्यावरील ही थोडा फार कमी झाल्याचे जनतेतून बोलल्या जात असले तरी ठाण्याचे तत्कालीन सपोनि विजय जाधव यांच्यासह नरसी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच गजानन शिवाजीराव पाटील भिलवंडे यांच्या पुढाकारातुन सदरचे महत्वाची कामगिरी झालीमुळे जनतेतुन समाधान मानले असले तरी सदरची कामगिरी ही कौतुकास्पद असल्याचे तमाम जनतेतून बोलल्या जात असून नरसीच्या चौकात मोठया प्रमाणात महिला वर्गासह जनते बरोबर वाहनाची आणि इतर राज्यात जाण्यासाठी व येण्यासाठी प्रवाशाची वर्दळ होत असते त्यांची चोरा कडून लूटमार होऊ नये म्हणून सदर सिसिटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहे
