Header Ads Widget

मन्ना महाराज कोलंबिकराच्या प्रगट

दिना निमित्त दीर्घायुरारोग्य लाभो ही

प्रार्थना !!

नायगाव फास्ट न्यूज : शब्दांकन बाळासाहेब पांडे मांजरमकर :-

प्रातः स्मरणीय परम पुज्य  परात्पर सदगुरू ' कोलंबी नगरी चे भुमी पुत्र महान अवलिया महात्मा 'मन्ना महाराज कोलंबिकर यांचा आज प्रगट दिन या निमित्त त्यांच्या प्रति सद्भभावना व्यक्त साष्टांग प्रणिपात करतो व ईशवर चरणी प्रार्थना करतो की,त्यांना उदंड आयुष्य व आयुररोग्य लाभो ही प्रार्थना करतो धरती आमची झोपडी आकाश आमचे पांघरुण या नवनाथांच्या उक्ती प्रमाणे अख उभे आयुष्य तपश्चर्या आणि जनकल्याण साधणारे विदेही मुर्ती ' पंचविस वर्षापुर्वी त्यांचे रूप व संचार  अंगात प्रचंड दैवी शक्तीची धुंद ' साक्षात यम देवाची सुद्धा मन्ना महाराजांच्या नजरेकडे पाहण्याची ताकत नव्हती . तो महाराजांचा काळ आम्ही प्रत्यक्ष पाहीला आहे.

.           अनेकांनी पण पाहीला आहे 
.         काय मी या सांगू  संताचे उपकार ।
.          मज निरंतर जा ग वि ती ॥

या संत वचना प्रमाणे श्री महाराजां नी कार्य केले आहे. ते स्वतः जीवनमुक्त  आहेत. आणि निज भक्तांचा उद्धार करण्यासाठी प्रकट झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुकयात विशेषतः नायगाव  उमरी धर्मा बाद  देगलूर मुखेड आणि इतर ठिकाणी महाराजांच्या दैवी शक्ती च्या अनुभव हजारों भक्तगणांनी घेतला आहे हाराजांच्या आशीर्वादाने अनेक भक्तांनी परमार्थाच्या उच्च कोटी मध्ये प्रवेश केला आहे .भक्ती ज्ञान वैराग्य तप आणि प्रेम इत्यादी दैवी शक्त्या आपल्या महाराजा . मध्ये अखंड  वास करून आहेत

जगात पिशाच्य अंतरी जो शहाणा सदा ब्रम्ही जाणा निमग्न तो । ब्रम्ह भूती संत जगी अवतरले ।
उद्धराया आले  दिन जना ॥

ब्रम्ही भूत विदेही जीवन मुक्त ' येहळेगावचे श्री तुका माई वडूजचे यशवंत बाबा  इकळी माळ येथील परमहंस  परबता महाराज कंधार तालुक्यातील पेंडू बू) येथील महान अवलियायोगीराज निवृती महाराज यांच्या सारख्या महान सिद्धांच्या परंपरेतील आपणा सर्वांचे आवडते सदगुरु श्री मन्ना महाराज आज च्या या तिथीला या भुतलावर  अवतीर्ण झाले प्रकट झाले ते केवळ आपल्या उद्दारा साठी चयात तिळमात्र शंका नाही* . अशा महात्म्यां ची संगत जन्मो जन्मी अखंड अखंड घडो ही च  सदगुरु चरणी  कळकळीची प्रार्थना सदगुरु मन्ना महाराज प्रकट दिना निमित कोटी कोटी दंडवत प्रणिपात  --

लेखन बालाजी काळे नायगाव शब्दांकन बाळासाहेब पांडे मांजरमकर !!