Header Ads Widget

खासदार हेमंत पाटिल अडचनीच्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी ; सरसकट सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी आग्रही


हिमायतनगर - नागोराव शिंदे  : - 

गेल्या आठवड्यात अतिवृष्टी, काही ठिकाणी ढगफुटी स्वरूपाचा पाऊस पडला यामुळे पुर परस्थिती निर्माण होवुन, पुराच्या पाण्यामुळे हजारो एक्कर जमीन बाधित झाली, परिणामी कोवळी पिके कोमेजुन गेली, यात शेतकऱ्याच मोठ नुकसान झाल आहे, खेडेगावाकडे जाणारे रस्ते खरडले, पुल खचले आहेत, पुराच्या नैसर्गिक आपत्तीने सर्वसामान्य लोकांच्या जीवनावरही परीणाम झाला आहे, यातुन सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई म्हणुन सानुग्रह अनुदान मिळवुन देण्यासाठी आग्रही असल्याच खासदार हेमंत पाटिल यांनी सांगितल तशा सुचनाही खासदारांनी प्रशासकिय अधिकाऱ्यांना दिल्या, ते हिमायतनगर तालुक्यात दि. १६ शनिवारी पुर बाधित गावांच्या दौऱ्यावर होते. 
यावेळी उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटिल,  माजी जिल्हा प्रमुख बाबुरावजी कदम, उपजिल्हा प्रमुख ज्योतीबा खराटे, तहसिलदार विजय अवधाने, माजी जी.प. सदस्य संभाराव लांडगे, बबनराव कदम, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, उपकार्यकारी अभियंता देवेंद्र तुंगेनवार, तालुका कृषी अधिकारी बि.ए. शेन्नेवाड, शहर प्रमुख प्रकाश रामदिनवार, सरपंच विशाल राठोड, दत्ता हंगरगे, राजेश जाधव, जेष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, विलास वानखेडे, सत्यवृत्त ढोले, किसान सेनेचे ता.प्रमुख प्रकाशभिया जाधव, दिनेश जाधव, भाजपायुमो ता. अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, वामनराव मिराशे, गजानराव हरडपकर, ग्रापस लखन जैस्वाल, सरपंच लालसिंग जाधव, दिनेश सुर्यवंशी, दिनेश जाधव, यांच्यासह ग्रामस्थ शिवसैनिकांची उपस्थिती होती.
तसेच नायब तहसिलदार अनिल तामसकर, मंडळअधिकारी मनोज खंदारे, तलाठी पुरी, पुणेकर, गुट्टे .कृषी विभागाचे मंडळअधिकारी एम.एस. आडे, मंडळअधिकारी मारोती काळे, राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता पारीख, अभियंता वडजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता मारोती डांगे, शा. अभियंता राहुल वाघमारे, शा. अभियंता सुनिल पोपुलवार, शासकिय गुत्तेदार एस.एस. पळशीकर., पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साईनाथ चिंतावार, पोलिस निरीक्ष भुसनुर, पो.कॉ. चोले, यांची उपस्थिती होती.