शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात विविध सुविधेचा प्रचंड अभाव असल्यामुळे इंटर नेट सेवा नेहमी खोळबंत असते गेल्या दोन ते तीन दिवसा पासून नायगाव तालुक्यातील खेड्यापाड्यातील शेतकऱ्याच्या पिकाचा विमा भरणे चालू असताना दुसरीकडे इंटरनेट सेवा विस्कळीत झाली असल्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यासह विमा भरून घेणारे मालक चांगलेच वैताकले असल्याचे दिसून येत असून अशा गंभीर बाबीकडे संबंधित टॉवर धारकांनी लवकरात लवकर विस्कळीत झालेली इंटरनेट सेवा सुरळीत करावी असी मागणी जनतेची जोर धरित आहे
नायगाव तालुक्यातील व बाहेर तालुक्यातील शेतकरी विमा भरण्यासाठी नायगाव येथे येत आहेत परंतु ग्रामीण भागातील म्हणजे खेड्यापाड्यातील शेतकरी जवळच्या दुकानावर जाऊन विमा भरण्यासाठी गर्दी करत असले तरी मोबाईल टॉवर व इंटरनेट सेवा सध्याची परिस्थितीत बरबडा, घुंगराळा व आदी ठिकाणी सदरची सेवा खोळबंली असल्यामुळे शेतकऱ्यातुन संताप व्यक्त केला जातं असून अशी गत शेतकऱ्यांनी के वाय सी करत असताना सुद्धा अशीच बोबांबोबं झाली आणि अनेक शेतकरी के वाय सी करण्या पासून वंचित राहिले असल्याचे व्रत आहे
