बरबडा : किरण हानमंते
बरबडा :- महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहे.राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा व पंचायत समित्या या सार्वत्रिक निवडणुका साठी 13 जुलै रोजी सोडत आरक्षण काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.त्यानुसार आरक्षण सोडत नायगाव येथे होणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी सांगितले आहे.याची माहिती राजकीय पुढारी यांना समजताच बरबडेकरांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे
नायगाव तालुक्यातील पुढारी यांचे आरक्षण
कोणाला सुटेल हे येणारी तारीखच सांगु शकेल त्यामुळे सर्व बरबडेकरांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे.
ओपन प्रवर्गासाठी बरबडा जिल्हा परिषद गट आरक्षित झाल्यास नक्कीच भाजपा कडून जवाहरलाल नेहरू शिक्षण समितीचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलिपराव धर्माधिकारी, काँग्रेस कडून मनोज पाटिल मोरे, आणि माजी जि. प. सदस्य बाळासाहेब धर्माधिकारी तसेंच अन्य राजकीय पक्ष बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे सुद्धा आपापले उमेदवार उभे करण्याची शक्यता असल्याने हि निवडणूक रंगत ठरणार असल्याचे बोलल्या जात आहे. जर मागास प्रवर्गास सुटल्यास सरळ लढत होणार असल्याची चर्चा होत आहेत.
मांजरम आणि देगांव गट खुल्या प्रवर्गासाठी सुटला नाही तर तेथील पण इच्छुक उमेदवार बरबडा गटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामध्ये आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पूनमताई पवार, वसंत पाटिल सुगावे, शिवराज पाटिल होटाळकर हे सुद्धा या गटात येऊ शकतात अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे अशी रंगतदार चर्चा बरबडा जिल्हा परिषद गटात ऐकावयास मिळत आहे.
