मधुकर जवळे : विश्वाभंर वन्ने :
नायगाव फास्ट न्यूज :-
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात गेल्या तीन ते चार दिवसा पासून संततधार पावसामुळे व त्यात वादळी वारे सुटल्यामुळे बऱ्याच पैकी गावात विद्युत वितरण कंपनीचे खांबे उपडून खाली पडल्यामुळे अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे व्रत असून अतिशय वेगाने पाऊस कोसळल्यामुळे नदी नाले पुराच्या पाण्याने वाहत असल्याचे दिसून येत असून सदरच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे डब्ब्ल पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याचे व्रत असून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यासह लाईन मनाला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे वास्तव चित्र ग्रामीण भागात पाहवयास मिळत आहे
तालुक्यातील खेड्यापाखेड्यात दिनांक ८ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाने वाढली वाऱ्यामुळे रुई बु येथे आकरा हाजर विद्युत प्रवाहा असलेल्या विद्युत तारा घुंगराळा ते बळेगाव रुई बु जाणाऱ्या रस्त्यावर पडल्या होत्या पाऊस इतका मोठा होता की एका तासातच रुई बु येथील पाझर तलाव अर्धाच्या वर भरले तर नाल्याना पूर आला दिनांक ९ जुलै २०२२ रोजी सुद्धा सूर्यदय नागरिकाला दर्शन दिला नाही ही परिस्थिती गेल्या तीन ते चार दिवसा पासून कायम असून जनावराच्या वैरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे
नायागांव तालुक्यातील गेल्या तीन दिवसा पासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्याना पूर शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान वादळी वाऱ्यामुळे आकारा हजार केव्हीचे विद्युत खांबे खाली पडलीअसल्याचे दिसून येत असले तरी पाऊस चालूच असल्याचे व्रत असून अशी परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांच्या जमिनी ही खरडून जाण्यासाठी काही वेळ लागत नसल्याचे शेतकऱ्यांतुन बोलल्या जातं असले तरी बऱ्याच पैकी गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता वर्तवली जातं आहे
