Header Ads Widget

हिमायतनगर तालुक्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे जन जीवन विस्कळीत..अनेक गावचा संपर्क तुटला..शेतकऱ्याचे अतोनात नुकसान.... हिमायतनगर पळसपुर डोलारी गांवाचा संपर्क तुटला




हिमायतनगर :- नागोराव शिंदे := 

तालुक्यातील काल दि 8 जुलै पासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक  गावांमध्ये पाऊसाचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घरांमध्ये पाणी जाऊन जन जीवन विस्कळीत झाले असल्याचे पहायला मिळत आहे तर शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे पहायला मिळत आहे तर अनेक गावचा संपर्क तुटल्याने जन जिवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे  नागरिक आपला जीव मुठीत धरून  या मुसळधार पाऊसा पासून आपले सोरक्षण करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी सहारा घेत आहेत तर या पूर सदृष्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी हिमायतनगरचे तहसिलदार कर्तव्यदक्ष डी एन गायकवाड यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ पथक पाठवण्याची फोनवरून माहिती दिली आहे आहेत

येथील महसूल  पथक सुद्धा अशा परिस्थितीची पाहणी करताना कुठेच दिसून येत नाही ? त्यामुळे ह्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर येथील नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आल्याचे पहायला मिळत आहे
 अनेक गावच्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले असल्याचे पहायला मिळत आहे त्यामुळे मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी तालुक्यातील पूर सदृश्य परिस्थितीचा आढावा घेऊन शासनाकडून गरजेच्या ठिकाणी तात्काळ मदत पोहचवावी अशी मागणी होत आहे..



तालुक्यातील पवना-आंदेगाव , महादापुर ते सवणा,पांघरी ते खैरगाव या गावांना देखील पुराच्या पाण्याने वेढले आहे त्यामुळे अनेक गावचा संपर्क तुटला असल्याचे  तालुक्यात बोलल्या जात आहे व अनेक छोट्या मोठ्या नद्यांना पूर आला असल्याने अनेक गावचा विद्युत पुरवठा महावितरण करून  खंडित करण्यात आला असून  मोबाईल नेटवर सुद्धा गायब झाले आहे व शेतातील पिकांचे खुप मोठे नुकसान झाले असल्याचे पहायला मिळत आहे त्यामुळे काल दि 8 जुलैच्या रात्रीपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे ह्याचा आढावा घेण्यासाठी तालुक्यातील कुठलेच अधिकारी घटना स्थळी उपस्थित नसल्याचे दिसून येत आहे