Header Ads Widget

नायगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस आढावा बैठक व नूतन पदाधिकारी निवडीसंदर्भात मुलाखत संपन्न



नायगाव फास्ट न्यूज -:- मधुकर जवळे -:-

नायगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नायगावच्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष विधानसभा अध्यक्ष यांच्या नवीन निवडी संदर्भात आढावा बैठक व इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या अशी माहिती बैठकीचे आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे बरबडेकर यांनी दिली आहे या आढावा बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी व इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी* यांची प्रमुख उपस्थिती होती आणि यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांनी केले आहे 

सूत्रसंचालन पंढरी पाटील डाकोरे यांनी केले तर आभार राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष केरबा रावते यांनी मानले यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे विद्यमान तालुकाध्यक्ष अमोल सातेगावकर माधव बेंद्रीकर केरबा रावते राजेश ढगे गजानन पवार,अखिल चोंडे आदी कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या आहेत 
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष संभाजी पाटील मुकनर राष्ट्रवादी  युवक कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष चंद्रकांत पा.टेकाळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाचिटणीस पंढरी पा.डाकोरे राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शादुल होणवडजकर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे मा.जिल्हाउपाध्यक्ष मारोतराव कदम राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाचिटणीस व्यंकट शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राष्ट्रवादी युवक  कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी मुकनर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पक्षसंघटन बळकट करा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे संघटन तालुक्यात मोठ्या प्रमाणात करा असे आवाहन केले आहे