बाळासाहेब पांडे -:- विशेष नायगाव प्रतिनिधी
कृषी महाविद्यालय नायगावच्या विद्यार्थ्यींनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी-औद्योगिक संलग्नता उपक्रमा अंतर्गत मोजै शेळगाव येथे कृषिदिन उत्साहात साजरा केला.महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. यावर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आपल्या स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे,
कृषी दिनाचे औचित्य साधुन वसंत रोपवाटिका, कृषी महाविद्यालय नायगावच्या वतीने विविध प्रकारची फळझाडे व शोभिवंत रोपे गावामध्ये वृक्षारोपणासाठी रावे विद्यार्थींना उपलब्ध करून देण्यात आली विद्यार्थ्यींच्या वतीने गावामध्ये वृक्षदिंडी, वृक्षारोपण, शेतकऱ्यांना फळझाडे रोपे वाटप कार्यक्रम इत्यादी उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच, जळबा वाघमारे व शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनिता सूर्यवंशी,पद्मजा साखरे,शारदा राखोंडे, नेहा शेख,वैशाली तपघाले,दिपाली ससाने, दिपाली मारवाडी, तेजस्विनी राठोड,जयश्री पाशपू,श्रीकरुणा येडली,स्नेहल पामलवाड गायात्री तेलंग समृद्धी तांबागडे या सर्व कृषी कन्यांनी अथक परिश्रम घेतले.
आयोजित केलेला सदरील कार्यक्रम डॉ. डी. एन. गोखले, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि ) वनामकृवि, परभणी, डॉ. आर. पी. कदम, विभागप्रमुख, विस्तार शिक्षण विभाग, कृषि महाविद्यालय परभणी, डॉ. पी के राठोड, विद्यापीठ प्रतिनिधी, एज्युकेशन सोसायटी नायगाव चे सचिव श्री रविंद्र वसंतराव चव्हाण, संचालक श्री रमेश लव्हेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश नादरे, रावे कार्यक्रम समन्वयक प्रा. शंकर नागणीकर, रावे कार्यक्रम अधिकारी प्रा.दुर्गा चाटसे विषय तज्ञ प्रा. संभाजी तळणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.
