Header Ads Widget

लग्न सरांईसह उन्हाळ्यात शंभर टक्के ग्राहकांना लुटले "अन "पावसाळ्यात पन्नास टक्के व्यापारी गटा कडून सुट दान


.   मधुकर जवळे 
नायगाव तालुक्यासह बाहेरील तालुक्यातील ग्राहक लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी व बसता बांधण्या
साठी राज्यात प्रसिद असलेल्या नायगाव बाजार पेठेत बाजार हाट करण्यासाठी तुफानी गर्दी कापड दुकानात केली आणि अवण्याचे पावने कापड खरीदी केले त्यावेळेस शहरातील व्यापारी गट ग्राहकांना कापडयाच्या दरात लुटले "  अन " भर पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या खिशात रुपया नसताना पन्नास टक्के सूट दिले असल्याची चर्चा शहरात होताना ऐकावयांस मिळत असून ग्राहाकानी लग्न सराईत व उन्हाळ्यात कापडचा दर कमी करण्यासाठी विनंती करत होते परंतु व्यापारी मानत नव्हते आता पन्नास टक्के सूट देऊन ग्राहक वळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे 
नायगाव शहर हे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असल्यामुळे तीन  नामांकित राज्याला जाण्यासाठी सदरचा मार्ग जवळ आणि सोपा असल्यामुळे या शहरात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू राज्याशी निघडीत असलेल्या नायगाव तालुक्याची चांगली ओळख असल्यामुळे कपडे घेण्यासाठी नायगाव सोपे असल्यामुळे हे सर्व ग्राहक नायगावच्या व्यापाऱ्याकडे लग्न सराईत कपडे खरीदी केले त्यावेळी ग्राहाकाची लूट करण्यात ? आली परंतु पावासाळ्यात मात्र व्यापारी गटा कडून पन्नास टक्के सूट देण्यात आल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे शहरांत मोठ्या प्रमाणात बाजारात दैनंदिन लोक काहींना काही खरेदीसाठी गर्दी करीत असतात सदरचे कापड दुकानदार व्यापारी त्या गर्दीचा फायदा घेऊन लूट केले आहे