नायगाव फास्ट न्यूज :मधुकर जवळे :
जिल्ह्याच्या नायगांव तालुक्यातील शेळगांव गौरी या गावची जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळेची इमारत अनेक दिवसा पासून मोडकळीस आली असताना सुद्धाजिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर लक्ष देत नसल्यामुळे भर पावसाळ्यात जागोजागी शाळेच्या इमारतीत पाण्याची गळती होताना दिसत असून सदरील शाळेत विध्यार्थी शिक्षण घेण्यासाठी विध्यार्थी येत आहेत अशा पद्धतीच्या धोकादायक इमारतीत विध्यार्थी व शिक्षक जीव धोक्यात घालून मुलं शाळेत बसवतात आणि बसतात या गंभीर बाबीकडे जिल्हा परिषद शाळा गौरी यांच्या माध्यमातून पत्र व्यवहार ही करण्यात आला परंतु शासन या कडे लक्ष देण्यासाठी तयार नसल्यामुळे पालकातुन संताप व्यक्त केला जात आहे
नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव) गावाने स्वच्छता आणि जल व्यवस्थापनाचा ‘पॅटर्न’ तयार केला आहे. लोकाभिमुख उपक्रम राबवत निर्मल, पर्यावरण संतुलित समृद्धग्राम, आदर्शगाव म्हणून राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. शाश्वत उत्पन्नासाठी गावातील शेतकरी फळबाग, रेशीम शेतीकडे वळले आहेत. ग्रामपंचायतीतर्फे महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न होत आहेत. ‘आयएसओ’ मानांकनप्राप्त शेळगाव गौरी ग्रामपंचायत ग्रामविकासाच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरत असले तरी या आदर्श गांवात विद्यार्थीना शिक्षण घेण्यासाठी जिल्हा परिषदची शाळा मोडकळीस आली असताना सुद्धा प्रशासन बेदखल करीत असल्याचे दिसून येत असून अशा बाबीकडे
जिल्हा परिषदच्या मुख्याकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी आदर्श शेळगाव गौरी जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष देतील का ? पावासाने शाळा गळतो आहे
गावाला मिळाले काही उल्लेखनीय पुरस्कार जल व्यस्थापन पुरस्कार (राज्यस्तरीय प्रथम) निर्मलग्राम पुरस्कार (राष्ट्रपती) महात्मा गांधी तंटामुक्तगाव (विशेष पुरस्कार) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान (राज्यस्तर द्वितीय) सामाजिक समता पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम (राष्ट्रीय) यशवंत पंचायतराज सशक्तीकरण अभियान (केंद्र व राज्य) स्मार्टग्राम योजनेअंतर्गत तालुका स्तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम राज्यस्तरीय द्वितीय आदर्शग्राम राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार (२०१८) देण्यात आलेल्या गावची शाळा अधिकाऱ्यानी पाहून घ्यावी तात्काळ शाळेला दुरुस्ती करावी अशी ही जनतेतून मागणी अनेक महिन्यापासून जोर धरित आहे
