हिमायतनगर प्रतिनिधी/- नागोराव शिंदे
शहरातील कनकेश्वर तलाव जवळ श्री गणेश विसर्जन व दुर्गा विसर्जनासाठी नगर पंचायत कडून एक निविदा प्रकाशित करून मागील तीन वर्षांपूर्वी एक विसर्जन कुंड बांधकाम करण्यात आले होते त्या कुंडाच्या तीन कडा मुसळधार पावसाच्या पाण्याने ढासळून गेल्याने सदरील बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे उपस्थित भाविक भक्तान कडून बोलल्या जात आहे त्यामुळे या स्थानिक गुत्तेदाराच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडल्याने येथील नगर पंचायत प्रशासक ह्यावर काय कार्यवाही करतील हे पाहणे मात्र ठरणार आहे
हिमायतनगर शहरातील कनकेश्वर तलाव हे शहरा पासून हाकेच्या अंतरावर आहे तिथे निसर्ग रम्य वातावरणात श्री गणेश मंदिर असून तीथे अनेक भाविक भक्त दर्शनासाठी नेहमी येत असतात लगतच असलेल्या कनकेश्वर तलावात दरवर्षी श्री गणेश मुर्ती विसर्जन व दुर्गा मूर्ती विसर्जन करण्यासाठी एक शासनाकडून वेगळा कुंड बांधण्यात आला होता त्याला नगरपंचायत प्रशासनाने २५ लक्ष रूपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला होता त्याचे काम एका नगरपंचायतच्या नगरसेवकाने सदरील काम आपल्या पदरात पाडून घेतले होते त्यांनी येथील २५ लक्ष रूपयाचे काम हे अतिशय निकृष्ट व थातूरमातूर पद्धतीने उरकून येथील निधी उचलून शासनाच्या डोळ्यात धूळ फेक करत हे काम केले होते पण ते काम तीन वर्षातच ढासळून गेले आहे
गेल्याने सबंधित गुत्तेदाराच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे गेल्या काही दिवसांपासून या भागात चांगला पाऊस होत असल्याने येथील विसर्जन कुंडाच्या तीन कडा वाहून गेल्याने नगर पंचायत प्रशासनाच्या कारभारावर पण येथील गणेश भक्तांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे काही दिवसांच्या तोंडावर गणेश उत्सव व दुर्गा उत्सव येऊन ठेपले आहेत त्याच पार्श्भूमीवर शहरातील गणेश भक्तांनी आता कोठे गणेश विसर्जन करायचे असा प्रश्न गणेश भक्तांना पडला आहे ? त्यामुळे नगरपंचायतचे मुख्याधिकारी हे सबंधित गुत्तेदारावर काय कार्यवाही करतील असा ही प्रश्न उपस्थित होत आहे
त्यामुळे अशा विकास कामाच्या नावांवर थातूरमातूर पद्धतीचे निकृष्ट कामे करून जनतेच्या माथी मारण्याचे काम शहरातील गुत्तेदारा कडून होत आहे .येणाऱ्या निवडणुकीत जनता अशा भष्ट गुत्तेदांरास त्यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचे सुजान नागरिकांतून बोलल्या जात आहे. आता तरी नगरपंचायत प्रशासन या निकृष्ट कामावर काय कारवाई करणार ? हे पहावे लागेल अन्यथा येणाऱ्या काळात सर्व गणेश भक्त नगर पंचायत प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करतील असे शहरवाशीयान कडून सांगण्यात येत आहे.
