Header Ads Widget

येत्या चोवीस तासात अतिवृष्टी होणारं असल्यामुळे 
घरा बाहेर पडू नये कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांचे नागरिकांना आवाहन 

.    माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांचे पोलीस दला मार्फत एक महत्वाचे आवाहन करण्यात येते की येत्या चोवीस तासात अतिवृष्टी होणार असल्यामुळे कोणत्या ही नागरिकांनी घरा बाहेर जाऊ नये व सतर्क राहावे आणि नदी, नाले, तलाव या ठिकाणीं जाऊ नका, विनाकारण घरा बाहेर पडू नये असा इशारा देण्यात आला असून पोलीस दला कडून देण्यात आलेल्या महत्वाच्या सुचनेचे नागरिकानी पालन करावे असे आवाहन ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना आवाहन केले आहे 
तालुक्यातील सर्व नागरिकांना व ज्येष्ठ मंडळींना पुन्हा पुन्हा आवाहन करण्यात येते की, नांदेड जिल्ह्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्यामुळे  व मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत व वाहत  असलेल्या रिमझिम व मुसळधार पाऊसाने आपल्या तालुक्यातील बरेचसे गावातील रस्त्यावर पुलावर पाणी येऊन पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठला ही अती उत्साह न करता आपण काळजी घ्यावी पाऊसाच्या पाण्याने रस्त्यावर चालणे सुद्धा अवघड होत आहे, आशा वेळीं आपण पाणी आलेल्या नाल्यातून गाडी घेऊन जाण्याचा अथवा चालत जाण्याचा प्रयत्न करू नये जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी व नागरिकांनी अत्यावश्यक कामा शिवाय दोन दिवस आपल्या घरा बाहेर पडू नका,  सर्व सुजाण जनतेनी काळजी घ्यावी ही विनंती

.