Header Ads Widget


हिमायतनगर   :- नागोराव शिंदे 
तालुक्यात  आठव्या दिवशी ही संततधार पाऊस कोसळत असल्याने पुर परिस्थिती गंभीर स्वरूपाची बनली आहे. खरिपाच्या पेरणीतील पिके आता वाया गेली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. व तसेच किनवट,  नांदेड महामार्गावर खैरगाव ज.  येथील नाल्यावरील पुलाचे बांधकाम ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत ठेवले असल्याने  पुराच्या पाण्याने हा महामार्ग बंद झाला असून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ठेकेदारांच्या अडमूठे धोरणाचा फटका आता प्रवाशी नागरीकांना बसत आहे.


गेल्या बुधवार पासून या भागात संततधार पाऊस काही तास उघडीप असा  अवधी सोडला तर पाऊस थांबायचे नाव घेत नाही.  परिणामी पुर परिस्थिती गंभीर स्वरूपाची बनली असून पैनगंगा नदीच्या पात्रात पाणी ओरफुलो होऊन नदी काठावरील हाजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे तर अनेकांची मातीची घरे पडून नुकसान झाले आहे. तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जनावरांना चारा उपलब्ध असला तरी सातत्याने होत असलेल्या पावसामुळे चारण्यासाठी रानात नेणे ही जिकरीचे ठरत आहे. कारण  या पावसाने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी  पुराच्या पाण्याने  जिव धोक्यात येण्याची भीती समोर उभी असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ही शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

खरिपाची पेरणी अतिवृष्टीत बाधीत झाली.  आणी पावसाने संततधार सुरूच ठेवल्याने  शेतकरी हवालदिल बनला आहे. आज तारखेपर्यंत विक्रमी साडेपाचशे मि.मी.  पावसाची नोंद झाली आहे.आता पाऊस थांबल्या नंतर नव्याने पेरणीसाठी शेतकऱ्यांना उभे  करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना अर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
घारापूर शिवारात रुद्राणी कंस्ट्रक्शन कंपनी ठेकेदाराच्या चुकीच्या सर्वेचा फटका बसला असून पहिल्या ठिकाणी  असलेला पुल नैसर्गिक रित्या पावसाचे पाणी वाहून जात होते. परंतु रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीने चुकीच्या पद्धतीने सर्वे करूण  दुसर्‍याच ठिकाणी नव्याने पुल उभारण्यात आला असून  त्या ठिकाणाहून पाणी न जाता साचून राहत असून पुराचे पाणी सर्वे न. ४६ व  तसेच  ४९ मध्ये शिरून शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई देण्यात यावी.  अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी  विठ्ठल रेखावार,  बालाजी शिंदे,  गणेश शिंदे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.