लोहा तालुक्यातील खळबळ जनक
घटना माळाकोळी पोलीस ठाण्यात
आरोपीच्या विरोधात ३०२ दाखल
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील खेडकरवाडी येथे वडीलाच्या व मुलाच्या नात्याला आणि माणवतेला काळीमा फासणारी घटना घडली असून आपल्या म्हताऱ्या वडिलांना स्वतःच्याच मुलानी वडिलाच्या छातीवर बसून गळ्याला फास आवळला असल्यामुळे त्यात वडिलाचा मृत्यू झाला म्हणजे स्वतःच्या मुलांनी वडिलांचा खून दिनांक ३० जून २०२२ रोजी दुपारी दोन ते वाजण्याच्या दरम्यान माळाकोळी पासून जवळच असलेल्या खेडकरवाडी येथे खळबळ जनक घटना घडली असल्यामुळे पोलीस घटनास्थळी रवाना झाले ज्या वडिलांचा गळा अवळून खून करण्यात आला त्या वडिलाचे नांव हावगी नारायण कल्याणी असे आहे
माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा ७२ / २०२२ कलम ३०२, ५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या आदेशानुसार नुसार माळाकोळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोके हे पुढील तपस करीत असले तरी सदरच्या मयताचे प्रेत माळाकोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास होते असी चर्चा होताना ऐकावयास मिळते
जिल्ह्यातील लोहा तालुक्याच्या खेडकरवाडी येथील रहिवासी असलेले मयत हावगी नारायण कल्याणी यांच्यात व त्यांच्या दोन मुलात पेरणीच्या व इतर कारणाहून वादावादी झाल्याचे समजते परंतु मयताche दोन्ही मुळे एक वेगळा प्लेन रचून म्हताऱ्या वडिलाच्या छातीवर बसून गळा आवळून खून केल्याची संताप जनक घटना घडली असून माळाकोळी पोलीस ठाण्यात फिर्यादी प्रभाकर घनश्याम वलांडे यांच्या तक्रारी वरुन आरोपी दोन मुलाच्या विरोधात ३०२ दाखल करण्यात आले आपल्या स्वतःच्या पित्याला जीवनातून संपवून टाकणाऱ्या आरोपी मुलाचे नावे सचिन हावगी कल्याणी, आणि हनुमंत हावगी कल्यानी हे त्यांचे गर्दनकाळ मुले आहेत


