बिलोलीच्या तहसीलदाराना प्रदेश
अध्यक्ष बहुजन फ्रंट ऑफ इंडिया
महाराष्ट्र राज्य शंकर पवारे यांचे
निवेदन
माधव पवार
महाराष्ट्र राज्यात सन २०१२ पासून शिक्षण क्षेत्रातील विविध पदावरील भारती बंद असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील खाजगी संस्था चालका कडून डोनेशन घेऊन पात्र उमेदवाराला डावलून शिक्षण सेवक क्लर्क इत्यादी पदाच्या जागा शासनाची नोकर भारतीची नसताना सुद्धा मधल्या मार्गाचा अवलंबून भरती करण्यात येत असल्याचा आरोप करीत बिलोलीच्या तहसीलदाराला देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला असून या बाबीचे प्रशासनानी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज भासत असल्यामुळे कुठे तरी आळा बसला पाहिजे असा उद्देश निवेदन कर्त्यांचा आहे
शैक्षणिक संस्था मध्ये बोगस नोकर भरती झाल्यास त्यांची जिल्हाधिकाऱ्यानी चौकशी करुन संबंधित संस्था चालकांनी केलेली भरती रद्द करुन जिल्ह्यातील हजारो पात्र उमेदवाराला न्याय मिळवून दयावेत व सदरील बोगस शैक्षणिक प्रक्रिया सेवक क्लर्क भरती रद्द नाही झाल्यास हाजरो पात्र उमेदवाराला सोबत घेऊन उपोषण करण्यात येईल असा बिलोलीच्या तहसीलदाराला दिलेल्या निवेदनात आरोप करीत इशारा शंकर पिराजी पवारे प्रदेश अध्यक्ष बहुजन फ्रंट ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य यांनी दिला आहे
जिल्यातील जिल्हा परिषद शाळा असो की खाजगी शाळा असो शिक्षण क्षेत्रात शिक्षणाच्या बाबतीत मोठी स्पर्धा लागली असल्याचे वास्तविकता ग्रामीण भागात पाहाण्यास मिळत असल्यामुळे शासकीय शाळे पेक्षा खाजगी शाळेचे दहावी व बारावीच्या परीक्षेत निकाल अनेक शाळेचे १०० टक्के निकाल पाहाण्यास मिळाले असले तरी खाजगी संस्था चालकांनी डोनेशन ? घेऊन शैक्षणिक नोकर भरती करीत असल्याचा ही आरोप दिलेल्या निवेदना करण्यात आला आहे यामुळे पात्र उमेदवार नोकर भरती पासून वंचित राहत असल्याचे निवेदनात म्हटले आहे
