Header Ads Widget

सात महिन्याचा कालावधी संपला

 तरी चौकशी करण्यासाठी टाळाटाळ

संबंधित अधिकारी करतात तरी काय ? 

नायगाव फास्ट न्यूज - 
नांदेड शहरातील माता गुजरी चौक ते रेल्वे अंडर ब्रिज या मुख्य रस्त्यावर अवैध पणे रेती विक्रेता व बिल्डिंग मटेरियल पुरवठा करणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करून दोन्ही बाजूने रस्ता कोंडला जात असल्याची ओरड जनसामान्य माणसातून होत असल्याचे ऐकावयास मिळत असल्यामुळे दिनांक १० नोव्हेंबर २०२१ रोजी सहायक आयुक्त क्षेत्रीय कार्यालय (१) यांना निवेदन कर्ता शेख मौला यांनी अतिक्रमण काढण्यासाठी निवेदन संबंधित अधिकाऱ्याना गेल्या सात महिन्या पूर्वी दिले होते परंतु अध्याप चौकशी करण्यात आली नसल्याचे निवेदन कर्त्यांचे म्हणे आहे
महाराष्ट्र शासनाने जिल्यात कोणत्याच ठिकाणी रेती घाटाचा लिलाव करण्यात नाही तरी शहरांत रेती येते तरी कुठून हा अतिशय महत्वाचा प्रश्न चर्चेला जात असून शहरात रेती पुरवठा करणारी यंत्रणा प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून वाहतूक केली जात असली तरी गेल्या सात महिन्या पूर्वी निवेदन देऊन सुद्धा आध्याप अतिक्रमण हटविण्यात आले नसल्याचे निवेदन कर्त्यांचा सरळ सरळ आरोप आहे
शहरात जाण्यास हा रस्ता सोयीचा आणि जवळचा असल्यामुळे दुचाकी सह अन्य चार चाकी वाहनांची रात्रनदिवस मोठ्या प्रमाणात वरदळ चालू असताना सुद्धा संबधित विभागाचे अधिकारी या जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत असून नागरिकाना याच वसाहतीतून नेहमीसाठी होणारा त्रास वाहतूक व रेती व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता ?  येत असे असताना सुद्धा संबंधितविभागाचा कानोडा डोळा का असा प्रश्न शहरातील वास्तव्यास असलेल्या नागरिकातुन केला जात आहे रेती माफियानी शहरात अवैध रेती विक्रीचा सपाटा उठवीला आहे