Header Ads Widget

ग्रामपंचायत कार्यालय बळेगाव यांनी नागरिकासाठी विहीर काढून पाण्याची उपलब्धता केली

बळेगाव येथे विद्युत वितरण

कंपनीच्या दुर्लक्षानामुळे पाणी

पुरवठा बारगळली 

        माधव पवार 
नायागांव तालुक्यातील मौजे बळेगाव ग्रामपंचायत कार्यालय विकासाच्या दिशेने झेप घेतली असून सदरच्या गावचे महिला सरपंच सौ वर्षा मिलिंद गायकवाड व उपसरपंच गंगाधर माधवराव पाटील बेलकर यांनी नायगाव पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमी योजने अंतर्गत गावच्या नागरिकांना मुबलक पाणी मिळावे आणि  बळेगाव नगरीची पूर्वी झालेली पाण्यासाठी वनवन कोणत्या परिस्थिती थांबली पाहिजे या हेतूने गावचे उपसरपंच गंगाधर बेलकर यांनी मंजूर करुन घुंगराळा ते रुई बु बळेगाव मार्गाववर असलेल्या रस्त्या लगद खोदली आणि गावाला पाणी पुरवठा होईल असे शासकीय विहिराला पाणी लागले परंतु विद्युत वितरण कंपनी युनिट कृष्णुर यांच्या कडून विद्युत पुरवठा करणारी डीपी बंद असल्यामुळे पाणी पुरवठा खोळबंला असल्याचे उपसरपंच गंगाधर पाटील यांनी सांगितले आहे
बळेगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत असलेली व काही भागातील वार्डाना विद्युत पुरवठा करणारी सिंगल फेजची डीपी गेल्या महिन्या पासून ना दुरुस्त झाली असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असला तरी पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचा नागरिकांना पाणी मिळत नसल्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यानी तत्काळ सिंगल फेज डब्बे द्यावेत असी मागणी या गावातील नागरिकासह सौ महिला सरपंच व उपसरपंच गंगाधर पाटील बेलकर यांनी केली आहे 
तालुक्यातील मौजे बळेगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे सौ महिला सरपंच सौ वर्षा मिलिंद गायकवाड यांच्यासह उपसरपंच गंगाधर माधवराव पाटील बेलकर वार्ड क्रमांक एक नागरिकांना पाण्याची टंचाई भासू नये म्हणूंन पंचायत समिती नायागांव यांच्या मार्फत रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर मंजूर करुन घेतली परंतु लाईट अभावी नागरिकाना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे उपसरपंच गंगाधर पाटील यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले असून विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यानी गावाला पाणी पुरवठा करणारी डीपी गेल्या अनेका दिवसा पासून बंद असल्यामुळे नागरिकांना भर पावासाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे वास्तविकता चित्र बळेगाव पाहवयास मिळत असल्याचे गावच्या महिला सरपंच सौ वर्षा मिलिंद गायकवाड उपसरपंच गंगाधर माधवराव पाटील बेलकर यांनी सांगितले आहे