नायगाव फास्ट न्यूज -:-माधव पवार -
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील अतिशय महत्वाचे ठिकाण ठरलेल्या नरसीच्या बस स्टँड मध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बेजबाबदारपणामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येत असून सदरच्या बस स्टॅन्ड मध्ये घाणीच्या पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याचे दिसून येत आहे असे असताना सुद्धा राज्य परिवहन महामंडळ अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे सदरचे घाणीचे पाणी नष्ट करण्यासाठी गिट्टी व मुरूम टाकून साफ सफाई केली तर दुर्गंधी नष्ट होण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही परंतु या सदरच्या बस्टँडच्या भोवताली प्रवाशासह प्रजा लघवी करुन घाण करीत असल्याचे दिसून येत आहे असे ही सदरील जनतेसह इतर प्रवाशांतून बोलल्या जात आहे -
तालुक्यातील नरसी हे गाव एकूण तीन राज्याला जोडले असल्यामुळे या तील कर्नाटक आंध्रप्रदेश तामिळनाडू या राज्याला जाण्यासाठी नरसीच्या येथून जावे लागते नरसी या गावात बस स्टैंड असल्यामुळे प्रवाशांना ही जाण्या-येण्यासाठी बस्टँड मध्ये यावे लागते परंतु सदरच्या बस स्टॅन्ड मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे जागो जागी घाण असल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले येत आहे सदरच्या बस स्टँड भोवती झालेली घाण कधी ? साफ करणार असा प्रश्न जनतेतून चर्चिला जात आहे महाराष्ट्र शासन एकीकडे स्वच्छता अभियान राबवा म्हणून मोठया तोऱ्यात अंमलबजावणी करतो तर दुसऱ्या बाजूने शासनाच्याच बस स्टॅन्ड मध्ये सोयी सुविधाचा प्रचंड अभाव आहे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांच्या बेजबाबदारपणामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे नरसीच्या बस स्टॅन्ड मध्ये दिसून आले आहे
तीन राज्याला जोडलेल्या नरसीच्या बस्टँड मध्ये साफ सफाई साठी केवळ एकच सफाई कामगार असल्यामुळे अधिकच्या कर्मचाऱ्यांच्या आवश्यकता राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यानी सदरची व्यवस्था करावी - मागणी -
नरसीचे बस स्टँड हे अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी असल्याने या ठिकाणी साफ सफाई करण्यासाठी केवळ एकच सफाई कामगार असल्याचे दिसून आले या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अधिकचे चार ते पाच सफाई कामगार दिले तर नरसीचे बस स्टँड अतिशय घाणीचे साम्राज्य नष्ट होऊन सुज्जळ होईल असे ही जनतेतून बोलल्या जात आहे आणि प्रवाशांचे व जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले थोडक्यात थांबेल असा ही प्रश्न जनतेतून केला जात आहे नरसीचा बस स्टँड हा अतिशय घाणीचा झाला असल्याने राज्य परिवहन महामंडळाची बस घाण पाण्याच्या ढपक्क्यातून जाताना सदरचे पाणी प्रवाशावर व जनतेवर उडत असल्याने मोठी दुर्गंधी पसरत असल्याचे दिसून येत आहे -
