Header Ads Widget

सत्तेसाठी पिसाट झालेल्या राजकीय पुढाऱ्यानो ग्रामीण भागाच्या विकासाकडे लक्ष द्या सहा महिन्यात बरबडा ते वजीरगाव पुलाचे काम करतो म्हणाऱ्यानी लावले आडीस वर्ष तरी काम होईना !!

  माधव पवार

नायगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील गेल्या अनेक वर्षा पासून असलेला बरबडेकरांसह अन्य रस्त्या बरोबर होणारा वनवास हा संताप जनक ठरत असल्यामुळे 

याच रस्त्या अभावी उद्योगधंदे बाजारपेठ कोलमडली
असल्याचे दिसून येत असून गावं सोडून अनेक व्यापाऱ्यांनी बाहेरच्या गावी जाऊन रूमा किरायाने खरीदी आपला व्यवसाय करीत असल्याचे समजते परंतु सत्तेसाठी पिसाट झालेल्या राजकीय पुढाऱ्यानी मात्र ग्रामीण भागाच्या विकासाकडे लक्ष देत नसल्यामुळे विकासाची चांगलीच वाट लागल्याचे दिसून येत असून असाच एक प्रकार बरबडा ते वजिरगाव मार्गावरील पुलाचे काम पूर्ण करुन देण्यासाठी गुत्तेदारानी सहा महिन्याचा अल्टीमेटम दिला होता परंतु अद्याप पुलाचे काम पूर्ण झाले नसल्याचे दिसते सदरच्या पावसाळ्यात बळेगाव बांधाऱ्याच्या बॅक वॉटरच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे
तालुक्यातील थोडक्याच पावसाने असी परिस्थिती निर्माण झाली तर अजून जैसे थे परिस्थिती असीच वर्षा नु वर्षे घडत राहणार असून सन २०२१-२२ सालातील विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रमा अंतर्गत ८ कोटी रुपये खर्च करून कहाळा ते मांडणी १३०० मीटर व बरबड्यासाठी राज्य- महामार्गापासून २४०० मीटर पुढे रस्ता तयार करण्यात आला परंतु खर तर राज्य महामार्ग पासून बरबडयाच अंतर हे ७ किलोमीटर असल्यामुळे आणखी ४६०० मीटर पुढे बरबडा हे गाव असताना इथ पर्यंतच निधी मंजूर असल्याची माहिती सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिकारी हात वर केल्याचे समजते मात्र पुढच्या रस्त्याचं काय..? असा प्रश्न निर्माण झाला असून शिल्लक असलेल्या रस्त्यात अत्यंत खड्ड्याच साम्राज्य पसरत असून सध्याच्या परिस्थितीत पावसाळा असून बडबडेकरांना व तालुक्यातील खड्ड्यात नागरिकांना जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे वास्तविक पाहिले तर बरबडा ते वजीरगाव पुलाचे काम मात्र अर्धवट अवस्थेत दिसत आहे