नायगाव :- विश्वाभंर वन्ने
कल्याण टोल नाका इंदूर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगावच्या उपअभियंत्याच्या बेजबाबदारपणामुळे नायगाव येथे प्रवाशाना बसण्यासाठी मोठा निवांरा बांधण्यात आला नसल्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशाना रखरखत्या उन्हात थांबून नांदेड अथवा आंध्रप्रदेशात जावे लागत असताना सुद्धा झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन कधी निवाऱ्याच्या बांधकामाकडे लक्ष देतील का असा प्रश्न जनतेला पडला आहे
सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी राहून तालुक्याचा कारभार उंटावरून हाकत असल्यामुळे अनेक कामे खोंळबली असल्याचे दिसून येत आहे
नायगाव विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी नायगाव येथील नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेले बस्टँड या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी निवारा नसल्यामुळे मोठया प्रमाणात गैरसोय होत असल्यामुळे माजी आमदारानी वरिष्ठ पातळीवर निवारा बांधन्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत असून सदरच्या बस स्थनकाचे काम कधी मार्गी लागेल असा ही पडला आहे
