नायगाव : -बाळासाहेब पांडे
आण्णा हजारे च्या आंदोलनाने राष्ट्राचे राजकारण हादरते याचे कारण त्यांच्या आंदोलनातील शक्ती ही जनहितार्थ व जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी आहे.या मुळे समाजातील सर्व स्तरातील जनतेनी आणाच्या विचारांचा धागा बनून आपल्या सह सर्वांचा विकास पदरात पाडून घेण्यासाठी आणाच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे विचार आणा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी न्यास चे राज्य उपाध्यक्ष सेवा निवृत्त प्राचार्य बालाजी कोम्पलवार बेंद्रीकर यांनी व्यक्त केले.
-------------------------------------------------------
या वेळी जिल्हाध्यक्ष ऍड धोंडिबा पवार , उपाध्यक्ष
आयर साहेब,दता तुमवाड, भा.ग.मोरे ह स खडगावकर बाळासाहेब पांडे, आदीने आपले विचार व्यक्त केले.ता अध्यक्ष माधव मामा कोकुरले यांनी सर्वांचे आभार मानले.
--------------------------------------------------------------
ते भ्रष्टाचार विरोधी न्यास ता.शाखा नायगाव आयोजित शासकीय विश्राम गृह पाटबंधारे वसाहत येथे सोमवार दि.6 जून रोजी पार पडलेल्या बैठकीत ते अध्यक्ष स्थाना वरून बोलत होते.ते पुढे म्हणाले आणा येत्या 9 आगस्ट क्रांती दिनी दिल्ली येथे आंदोलन करणार असून आणाच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून शक्ती देण्या साठी तालुका शाखेने पुनरबांधणी करून नव्या बळाने आपली शक्ती पणाला लावत काम करावे असा विचार त्यांनी मांडले आहे
