माधव पवार
नांदेड जिल्ह्यात एकूण ३६ पोलीस स्टेशन असल्यामुळे ग्रहविभागा कडून पोलीस ठाण्याला देण्यात आलेल्या जुन्या पोलीस गाड्या बदलून नवीन गाड्या देण्यात आल्या परंतु बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्याना जुन्या पोलीस गाडीवर पंचेचाळीस गावाचा कारभार पाहावा लागत असल्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सदरच्या पोलीस ठाण्याला नवीन पोलीस जिप उपलब्ध करुन दयावेत असे या भागातील जनतेतून बोलल्या जात असले तरी रात्री बेरात्री पेट्रोलिंगकरावी लागत आहे
रामतीर्थ पोलीस ठाण्याला जनतेच्या वतीने नवीन पोलीस जिप देण्याच्या संदर्भात मागणी करुन ही लाल दिवा मिळेना या बाबतीत पत्रकार गंगाधर गंगासागरे यांनी एका वर्तमान पत्रात लाल दिव्याची गाडी मिळावी म्हणून बातमी प्रकाशित केली होती तरी ग्रहविभागाचा बेजबाबदार पणा ?
तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात लांब पल्याचे गावे असल्यामुळे पोलीसाना जुनीच जिप घेवून जावे लागते परंतु जुनी पोलीस जिप असल्यामुळे कधी वाटेत बंद पडेल यांचा अंदाज पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्यांना माहित नसते शासनाने रामतीर्थ पोलिस ठाण्याला फँटॅस्टिक पोलीस जिप तात्काळ मिळून देऊन भविष्यात होणारी गैरसोय टाळावी असे ही जनतेतून बोलल्या जात असून पंचेचाळीस गावाचे कार्यक्षेत्र आणि जुनी पोलीस गाडी ठाण्याला असल्यामुळे ती बदलून ग्रहविभागाने दूसरी पोलीस जिप दयावेत असी मागणी जनतेची जोर धरित आहे
