Header Ads Widget

खैरगाव फाट्याजवळ क्रुझर टिन शेडवर आधळली एक जागीच ठार हिमायतनगर तालुक्यातील दुर्दैवी दुर्घटना



 नायगाव फास्ट न्यूज :- माधव पवार 

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु.येथील एक गाडी व्यावसायिक तामसा येथील भाडे सोडून गावाकडे परत येत असताना एम एच २६ बी क्यू ७९९६ व्ही रोड वरून थेट खैरगाव शिवारातील टिना पत्र असलेल्या शेडवर आधळल्यामुळे झालेल्या सदरच्या दुर्घटनेत एक जागीच ठार झाल्याची घटना दिनांक ७ जून २०२२ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून दुर्दैवी  दुर्घटनेत चालक बालंबाल बचावला असला तरी दुसऱ्या एकाचा मृत्यू झाल्याचे समजते एकाच मृत्यू झाला असल्याचे समजते आहे
--------------------------------------------------------
सरसम येथील शिवारात घडलेल्या घटनेची माहिती 
हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली घटना स्थळी रवाना होऊन घटनेची पाहणी करून पंचनामा केलल या दुर्दवी घटनेमुळे सरसम बु.गावावर शोककळा पसरली या   गाडीचा चुराडा वाजला असला तरी एका प्राण गेल्याचे सांगण्यात येत असले तरी मयताचे नांव समजू शकले नाही --
तालुक्यातील मौजे सरसम येथील क्रुझर गाडी नेहमी प्रमणे भाडे घेऊन बाहेर गावी गेली होती सदरचे भाडे संबंधित गावाच्या ठिकाणी सोडून चालकासह अन्य एकजण आपल्या मूळ गावी परत येत होते. दरम्यान खैरगाव शिवारात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट शेतातील टिन शेडवरील झोडपड्यावर धडकली. या घटनेत झोपड्यावरील टीना पत्रावर ठेवलेले दगड थेट गाडीत घुसून वाहनातील एकाच्या डोक्याला गंभीर मार लागला असल्याचे सांगण्यात आले सोमवार ७ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सदर घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे