नायगाव तालुक्यातील मौजे राहेर व राहेर परिसरात महसूल प्रशासनाच्या आशिर्वादामुळे गट. क्र.४६७ मधील व अनेक ठिकाणी कुंभार समाजाच्या नावाखाली दोनशे ब्रास मातीची रॉयल्टी काढून पंचवीस ते तीस हवा व चार ते पाच जेसीबीच्या साहाय्याने मातीचे हजारो ब्रास उत्खलन होत असताना सुद्धा नायगावच महसूल प्रशासन झोपतच का ? असा प्रश्न निर्माण झाला असून सदरील होत असलेला अवैध उपसा कधी बंद होऊन शासनाच्या मालमत्तेची विल्हेवाट थांबेल असे रिपब्लिकन सेनेचे तालुका सरचिटणीस तथा पत्रकार विश्वाभंर वन्ने यांनी आपली भावना व्यक्त करीत सदरचा होत असलेला अवैध मातीचा अन्यथा उपोषण करू असा इशारा नायगाव फास्ट न्यूज बोलताना दिला आहे -
शासनाच्या तिजोरीला लाखो रुपयांचा महसूल पाण्यात बुडत असल्यामुळे नांदेडच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यानी लक्ष देण्याची गरज भासत आहे
तालुक्यातील मौजे राहेर व राहेर परिसरात वीटभटीसाठी लागणारी गोदा काठच्या मातीचं अवैध रित्या उत्खलन करुन लोहा तालुक्यात घेऊन जात असल्यामुळे नायगाव तहसीलदाराने हा प्रकार थांबवून शासनाच्या तिजोरी कडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ही रिपब्लिकन सेनेचे तालुका सरचिटणीस विश्वाभंर वन्ने यांचे म्हणे असून तालुक्यात वीट भट्टी धारकांना मातीची सप्लाय तलाठी व मंडळ अधिकारी व तहसील प्रशासनाच्या सहामतीने चालत असल्याचा ही यावेळी आरोप केला असला तरी राहेर गोदावरी काठा वरून अवैध मातीचा तुफानी उपसा होत असल्यामुळे ठेक्केदार मालामाल होत असल्याची चर्चा नायगाव तालुक्यात होत आहे
