Header Ads Widget

आंतरगाव येथील शासकीय गायरानात अतिक्रमण करुन शेतकऱ्यांचा रस्ता आडविल्या प्रकरणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याना सरपंचासह गावकऱ्यानी दिले निवेदन

 

         माधव पवार
नायागांव तालुक्यातील मोजे आंतरगाव येथे शासकीय गायरान जागेत म्हणजे गट क्रमांक २६३ मध्ये शेतकऱ्यांना जाण्यासाठी व येण्यासाठी पिढ्यान पिढ्या चालनाऱ्या वही वाटेवर अतिक्रमण करून शेतकऱ्यांचा रस्ता आढावल्या प्रकरणी सदरचा रस्ता मोकळा करण्यात यावा म्हणून ग्रामपंचायत कार्यालयासह गावातील कांही नगरिकांनी नायागांवच्या तहसीलदाराना दिनांक ७ जून २०२२ रोजी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे
तालुक्यातील आंतरगाव येथील अंदाजे २०० शेतकऱ्यांचा हा रस्ता अनेक वर्षा पासून असल्यामुळे याच रस्त्यावर वरून शेतकरी शेताकडे जातात परंतु गावातील काही शेतकऱ्यांनी सदरच्या रस्त्यावर म्हणजे गायरान असलेल्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास जाणवत असल्यामुळे आंतरगावाच्या ६३  शेतकऱ्यांच्या स्वक्षऱ्या असल्याचे निवेदन देण्यात आले असून या मध्ये ग्रामपंचायत कार्यालय यांनी सुद्धा विशेष लक्ष घातले असून  गायरान जमीनीवर केलेले अतिक्रमण तात्काळ काढून सदरच्या शेतकऱ्यांना मोकळा करून दयावेत असे गावचे सरपंच श्रीमती भीमाबाई तुळसीराम नागलवाड यांच्या  निवेदन वतीने देण्यात आले आहे
आंतरगाव येथील शासकीय गायरान जागेत काही शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण जलद गतीने संबंधित अधिकाऱ्यानी लक्ष घालून सदरचा रस्ता खुला करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामपंचायतच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली, उपविभागीय अधिकारी बिलोली, तहसील कार्यालय नायगाव, कुंटूर पोलीस ठाण्यात आंतरगावच्या शेतकऱ्यांसह सरपंच यांनी स्वाक्षऱ्या असलेले निवेदन दिले असून सदरील रस्ता पेरणी पूर्वी मोकळा नाही झाल्यास नायगावच्या तहसील कार्यालया समोर उपोषण करण्याcha इशारा ही निवेदना द्वारे देण्यात आला आहे