Header Ads Widget

सावधान :- महिलासाठी स्वरक्षा म्हणजे सुरक्षा महिलांनी अधिक दक्ष व सज्ज राहण्यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि विजय जाधव यांनी दिल्या महत्वाच्या सूचना -

  

      माधव पवार 

बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या वतीने एक महत्वपूर्ण मोहीम ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय डी जाधव यांनी दिनांक २२ऑगस्ट २०२१ रोजी ठाण्याचा पदभार स्विकारल्या पासून जनतेच्या माध्यमातून खाकी वर्दीतील पोलीस अधिकारी असला तरी चांगल्या कामाला उजाळा देत असल्यामुळे जनतेच्या विचारातुन अधिकाऱ्याच्या पाठिवर कौतुकाची थाफ मारली  जात असल्याचे दिसून येत असून वर्दीतील पोलीस अधिकारी असलेले सपोनि जाधव यांनी यांच्या कडून खबरदारी व सावधानतेचा महिलासाठी स्वरक्षा म्हणजे सुरक्षा महिलांनी अधिक दक्ष व सज्ज राहण्यासाठी सूचना इशारा देण्यात आला आहे 
तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि विजय डी जाधव यांच्या संकल्पनेतून व जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे महत्त्व जाना  पोलिसांनाच आपला खरा मित्र माना" असा सुंदर संदेश महिलासह नागरिकांना देत असल्यामुळे सर्वात जास्त महिला वर्गानी सतर्क राहिले पाहिजे असा महत्वाचा संदेश सपोनि विजय जाधव यांनी दिला असून याच माध्यमातून पत्रक काढून पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व म्हणजे एकूण ४५ गावात शेकडो पत्रकांचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असून महिला वर्गानी दिलेल्या सावधानतेच्या इशाराकडे लक्ष दयावेत असे सपोनि जाधव यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे