महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना अशा नामांकित तीन पक्षाचे राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले होते राज्याचा कारभार गेल्या आडीच वर्षा पासून राज्यात चालत असताना महाराष्ट्र राज्याचे व शिवसेना पक्षाचे मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेना पक्षाच्या तालमीतील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदाराचा गट बाजूला काढून राज्यात नाट्यामय तालीम चालू केली आणि करुन दाखविले आहे सदरच्या शिवसेनेच्या तालमितील राज्याचे नूतन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे
शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे यांच्याच पक्षातील आमदारानी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पद गमवावे लागले आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नूतन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात ही विचारांची हिंदुत्वाची व तत्वांची लढाई असून समविचारी गट एकत्र आला आणि राज्यात विकासाचे शासन आम्ही देणार असल्याचे फडणवीसानी
सांगितले आहे
