Header Ads Widget

नांदेडच्या दाभड फाट्या जवळ मोटार सायकल आयचरच्या धडकेत एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी


नायगाव फास्ट न्यूज -:- माधव पवार - 

अर्धापूर : नांदेड  नागपूर राष्ट्रीय  महामार्गावर दिनांक २९ जून २०२२ रोजी बुधवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान दाभड पाटीजवळ आयचरने वाहानाने जोराची धडक दिली असल्यामुळे सदरच्या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले होते परंतु त्या जखमी पैकी असलेला तरूण उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे 

अर्धापूर ते नांदेड मार्गे भरधाव वेगाने जाणाऱ्या आयचर ट्रक क्रमांक टि.एस. १२ यु.डी. १६८४ च्या आयचरची मित्राला बोलत असलेल्या उभ्या मोटार सायकला जब्बर धडक दिली असल्याने या अपघात सखाराम केशवराव राजेगोरे वय १९ याचा हात, पाय फ्रॅक्चर झाला होता प्रकृती ही चिंताजनक बनली होती सचिन नागोराव घोडे (वय २०), भागवत गणपत घोडे वय २६  हे दोघे जखमी असून हे तिघे शेलगाव तालुका अर्धापूर येथील असल्याचे समजते 
दाभड जवळ घडलेल्या अपघाताची माहिती मिळताच महामार्गचे प्रभारी पोलीस अधिकारी शंकर भोसले, सुनील पाचपोळे, अविनाश धुमाळ, वसंत शिंगारे, इर्शाद बेग, राजकुमार व्यवहारे,जमादार बालाजी तोरणे,ईश्वर लांडगे यांनी जखमींना खासगी रुग्णालय नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले.असता  सखाराम राजेगोरे यांच्यावर उपचार सुरू असतांना मृत्यू पावला असल्याचे सांगण्यात आले असून सदरील घडलेल्या घटने बदल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.