Header Ads Widget

मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांची घोषणा होतच;शिंदे समर्थकांकडून फटाक्यांचा आतिषबाजी


नायगाव -:- मधुकर जवळे - 
राज्याच्या सत्ता सत्ता संघर्ष व राजकीय गदारोळा नंतर अखेर राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा होताच नायगाव येथे शिंदे समर्थकांकडून फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला करण्यात आला आहे
यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, हिंद युवा परिषदचे राष्ट्रीय संयोजक रणजीत देशमुख, भाजपाचे युवा नेते गजानन चव्हाण शिवानंद डोईफोडे ,रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष साहेबराव चट्टे, शिवाजीराव गायकवाड, शाहीर बळीराम जाधव, अनिकेत कोकणे सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ दत्ता पाटील नारे जुनेद पठाण अतुल पाटील मंगरुळे साहेबराव पाटील शिंदे कोकलेगावकर शिवाजी पाटील कदम शेळगावकर आदींसह इतर कार्यकर्ते व शेतकरी उपस्थिती होती
याबाबत सविस्तर वृत्त असे की,  महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे साहेब होणार ही बातमी कानावर येताच नायगाव तालुक्यातील भूमिपुत्रानी व शिंदे समर्थकांकडून नायगाव शहरातील डॉ. हेडगेवार चौका येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शाहा, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडनवीस, एकनाथराव शिंदे , सदाभाऊ खोत यांच्या नावाचा जय घोष करीत व वंदे मातरम, भारत माता की जय  आशा  घोषणा देऊन आनंद शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या घोषणे बद्दल पेढे वाटून फटाके फोडून  जल्लोष साजरा करण्यात करण्यात आला आहे