Header Ads Widget

भक्तांचे सोंग घेऊन दत्त संस्थान कोलंबी मंदिराच्या गल्ल्यावर डल्ला मारणाऱ्या चोरट्याला पुजाऱ्याने रंगेहात पकडले तर एक चोरटा फरार


बाळासाहेब पांडे -:- विशेष प्रतिनिधी नायगाव -:-

कोलंबी येथील दत्त संस्थान मंदिरात भक्त म्हणून मुकाम करून दान पेटी वर मध्य रात्री उचलून घेऊन जानाऱ्या चोरट्याला मंदिराच्या पुजाऱ्याने रंगेहात पकडल्याची घटना  घडली असून एका चोराला पकडण्यात यश आले तर एकजण फरार झाला आहे.पकडलेल्या चोराला नायगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून नायगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.व  न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली आहे.
या बाबद अधिक वृत्त असे की कोलंबी येथील दत्त संस्थान येथे अनेक प्रकारचे भाविक भक्त मुकामी राहून दतात्र्ययाचा अखंड नामाचा पारा करतात वेग वेगळ्या गावावरून भक्त लांबून येतात असेच दोन भक्त गेल्या अनेक दिवसांपासून भक्तीचे सोंग घेऊन येथे मुक्कामी होते.या दिवसात त्यांनी या ठिकाणी पाळत ठेऊन येथे चालू असलेल्या बांधकामाचा फायदा घेत दि.२६ जून च्या मध्यरात्री येथील मंदिरातील कुलूप असलेली लाकडी दान पेटी घेऊन जात चोरीचा प्रयत्न केला.त्यातील एकाला जागरूक येथील पुजारी बसुबन महाराज उर्फ भुजंग जाधव महाराज यांनी रंगेहात पकडले तर दुसरा फरार झाला
ज्या आरोपीला पकडले त्यांचे नाव प्रवीण विजय भोसले रा.पिंगळी ता हदगाव असे असून,फरार झालेला आरोपी प्रशांत दिलीप सकनुरे रा नंदगाव ता मुखेड असे आहे आरोपी विरुद्ध भुजंग जाधव यांच्या फिर्यादीवरून गु.र.न.९८ /२०२२ भादवी ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक आनंद वाघमारे यांच्या कडे तपास देण्यात आला आहे.ताब्यात घेतलेल्या प्रशांत विजय भोसले या आरोपीला २७ जून रोजी नायगाव न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
-------------------------------------------------------------------

दत्त दत्त म्हणत गल्ल्यावर डला मारणारा --

कलयुगातला भक्त सदर घटनेची माहीती येथील मंदिराचे महंत श्री १०८यदुबन महाराज यांनी संस्थान चे अध्यक्ष माजी आ.वसंत चव्हाण यांना सांगितली त्यांनी गुन्हा दाखल करण्यास सांगितल्या नंतर नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदेंयांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या पूर्वी बऱ्याच वेळा दान पेटीतली रक्कम गायब झाली असल्याने या निमित्ताने फरार आरोपी सकनुरे यास अटक करून कसून चौकशी केली तर याचा ही तपास लागण्याची शक्यता आहे