विश्वाभंर वन्ने
-----------------------------
ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी-औद्योगिक संलग्नता उपक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय नायगाव येथील विद्यार्थ्यांनी ताकबिड येथे लोकसहभागातून ग्रामसर्वेक्षण (PRA) उपक्रम राबविला त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामसर्वेक्षण करताना व सामाजिक नकाशा काढताना गावातील गावातील ज्येष्ठ नागरिक आणि प्रगतशील शेतकर्यांचा सहभाग व मार्गदर्शन घेऊन त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचे स्वतःचे गाव कसे दिसते हे प्रत्यक्षात नकाशात उतरविले.
या नकाशात गावातील रस्ते सामाजिक संरचना घरे व वास्तव्याचा प्रकार शाळा ग्रामपंचायत इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आला आहें
सदरील उपक्रम राबवताना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावाचा संपूर्ण अभ्यास करून गावातील लोकांच्या समस्या व त्यांची सध्याची परिस्थिती जाणून घेऊन गावातील उपस्थित असलेल्या साधन संपत्तीचा अभ्यास केला.
हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी केशव भंडारे,गजानन भोसले,पवन भुसेवाड सुरेश तळणे प्रदिप आलापुरे,संगमेश्वर बोदले सुरज भालेराव या सर्व कृषी दूतांनी अथक परिश्रम घेतले व गावचे सरपंच श्री शिवराज पा. वरवटे , मा. सरपंच लिंगेश्वर पा. मडलापुरे,मदन पा. कुरे,शिवाजी पा. टेकाळे , गोंविद पा. कुरे मारोती पा. टेकाळे,मारोती पा. मडलापुरे व उपस्थित गावाकर्यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच हा कार्यक्रम एज्युकेशन सोसायटी नायगाव चे सचिव श्री रवींद्र पाटील चव्हाण, संचालक श्री रमेश लवेकर सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश नादरे सर , कार्यक्रम समन्वयक प्रा. शंकर नागणीकर सर व कार्यक्रम अधिकारी प्रा. अंकुश खांडरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला
