Header Ads Widget

इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर सेवापुर्ती गौरव सोहळ्याला उपस्थीतीत राहावे

पत्रकार गंगाधरराव गंगासागरे याचे

आवाहन 

   
-:- नायगाव फास्ट न्यूज -:- मधुकर जवळे 

गुरु रविदास फुले-शाहु-आंबेडकर चळवळीतील अग्रणी व्यक्तीमत्व  महापारेषण विभागाचे सहाय्यक अभियंता इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर हे नियत वयोमानानूसार ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त सकल बहुजन समाज नांदेडच्या वतीने त्यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा दिनांक १ जुलै रोजी शुक्रवारी दुपारी १२:३० वाजता नांदेड येथील होटल सीटी प्राईड येथे आयोजित केला आहे . याप्रसंगी सोहळ्याचे औचित्य साधून परीसरातील श्रमिक कामगारांना देखील मानाचा पुरस्कार देवून त्यांचाही सन्मान करुन एक आगळा-वेगळा उपकृम राबविणार आसल्याची माहीती संयोजन समितीने दिली आहे 
 
या गौरवशाली सोहळ्याचे उद्घाघाटक मुंबईचे माजी आमदार बाबूराव माने यांची प्रमुख उपस्थीती राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून रीपब्लिकन हक्क परीषदेचे प्रमुख रमेशदादा सोनाळे हे आहेत.तर प्रमुखअतिथी म्हणून नॕशनल भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे राष्टीय अध्यक्ष लोकेश कटारीया मेरठ (यु.पी.) , पिपल्स रीपब्लिकन पार्टीचे महासचिव बापूराव गजभारे , ओबीसी नेते बालाजी शिंदे , बसपाचे ॲड.संदीप ताजने यांसह राज्यातील मान्यवर मंडळी उपस्थीत राहणार आहेत 

यावेळी इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणाऱ्या  " निखारा " नावाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे . तसेच त्यांचा सेवानिवृत्ती बद्दल सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे तरी सदरील कार्यक्रमाला सर्व बहुजन समाज बांधवांनी उपस्थीती लावावी असे आवाहन संयोजन समितीचे प्रमुख डॉ.बालाजी पेनूरकर , गंगाधरराव गंगासागरे , विठ्ठल उकंडे , नामदेवराव फुलपगार , भिमराव वाघमारे , प्रकाश कामळजकर , संतोष बोराळकर , गौतमदादा भद्रे , चंद्रसेन गंगासागरे , सतीष भालके  , सुनिल कुबडे आदींनी केले .