हिमायतनगर:- चांदराव वानखेडे
आघामी काळातील जिल्ह्यत अवघ्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार असल्यामुळे हिमायतनगर तालुक्यात जिल्हा परिषद एक गट व दोन पंचायत समिती गणाची भर पडली आहे आता सिरंजनी जिल्हा परिषद गट व सिरंजनी मंगरुळ पंचायत समिती दोन गण निर्माण झाले असून सिरंजनी जिल्हा परिषद गट व सिरंजनी मंगरुळ पंचायत समिती गण मध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याने अनेकांनी आता पासूनच पक्षाकडे उमेदवारी मिळावी म्हणून गळ घातल्याचे बोलले जाते आहे
हिमायत नगर तालुक्यात जिल्हा परिषद गट व गण पुनर्रचना घोषित झाल्याने आता राजकीय वातावरणाला कलाटणी मिळत आहे सिरंजनी जिल्हा परिषद गट व सिरंजनी,मंगरूळ पंचायत समिती गण निर्माण झाल्याने कधी न दिसणारे चेहरे ऊदयास येणार आहेत. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेस, शिवसेना ,राष्ट्रवादी, भाजप ,प्रहार या पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून धडपड सुरू असून जिल्हा परिषद गट व गणाची वाढ झाल्याने तालुक्यात सिरंजनी हा जिल्हा परिषद गट नव्याने स्थापित झाला आहे तालुक्यात गटाची संख्या दोन वरून तीन व पंचायत समिती गण वाढल्याने गणा ची संख्या चार वरून सहा गेली आहे
--------------------------------------------------------------
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात राजकीय खेळपटी नवीन चेहऱ्याना संधी मिळणार ?
--------------------------------------------------------------
आघाडी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक विभागासह राजकीय पुढाऱ्यानी आपआपल्या हक्काचे गट व गण निर्मितीसाठीच डॉ प्रकाश वानखेडे, गणेश राव शिंदे, परमेश्वर गोपतवाड, विकास पाटील देवसरकर, सुभाष शिलेवाड, संजय काईतवाड, चांदराव वानखेडे ,शिवाजीराव पाटील ,विशाल राठोड, दिनेश राठोड, गणेशराव कोरडे .अवधूत कदम, नारायण करेवाड आदी जनानी आपापल्या पक्षाकडून तिकीट मिळविण्याच्या तयारीला लागले आहेत नवीन गटात अनेक इच्छुकांनी निवडून कसे येता येईल याची आकडे मोड आतापासून सुरू केली असून मीनी मंत्रालयात जाण्याचे दिव्य स्वप्न पहात आहेत.

