माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे बरबडा येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या दारू दुकानावर मारलेल्या धाडीत आरोपी कडून देशी दारूचे तीन बॉक्स यांची अंदाजे किमत आठ हजार ४०० रुपयाचा मुद्दे मालासह आरोपीला ही कुंटूर पोलिसांनी ताब्यात घेतले सदरची कारवाई नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली कुंटूर ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी महादेव पुरी यांनी छापा आडा उधवस्त केला आहे
------------------------------------------------------------------
बिलोलीच्या दारू बंदी अधिकाऱ्याचा बेजबाबदार पणामुळे अवैध देशी दारूला आला उत्त "आणि कुंटूर पोलिसांच्या धाडीवर धाडी चालू !
------------------------------------------------------------------
राहुल माधवराव येडके वय तीस वर्ष राहणार बरबडा यांनी दिनांक ५ जून २०२२ रोजी देशी दारू विकण्यासाठी तीन देशी दारूचे बॉक्स आणले होते पोलीसाना गोपनीय माहिती मिळाल्या वरून ८ हजार ४०० रुपयाचा माल बाळगून ठेवलेला मिळून आला कुंटूर ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या सुचनेनुसार बिट जेमादार रमेशराव मोहनराव निखाते यांच्यासहपोलिस नाईक लक्ष्मण सोनकांबळे ,मोहन कंधारे व इतर पोलीस कर्मचाऱ्यानी बरबडा येथे अवैध देशी दुकानावर बरबडा येथे दुसऱ्यादा धाड मारली आहे
