Header Ads Widget

राज्याचे माजी अर्थमंत्री मुनगंटीवार

कुटुंबीयांचे भाजपाचे खासदार प्रताप

चिखलीकरा कडून सांत्वन 

    नायगाव फास्ट न्यूज :-
नांदेड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचे वृद्धा पकाळाने निधन झाल्याने नांदेड लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी भेट देऊन मुनगंटीवार कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे डॉ.सच्चिदानंद मुनगंटीवार हे माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे वडील होते
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष चिन्मय मिशनचे अध्यक्ष डॉ.हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष अशा विविध व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या डॉ.सच्चिदानंद शिवसांब मुनगंटीवार यांनी समर्थपणे सांभाळल्या होत्या
सन १९६७ मध्ये त्यांनी भारतीय जन संघा कडून चंद्रपूर विधानसभेची निवडणूक लढविली होती
-----------------------------------------------------------------
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार नायगावकर व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे नरसीकर यांची प्रमुख्याने उपस्थिती होती
------------------------------------------------------------------
डॉ.सच्चिदानंद त्यांचे वृद्धाप काळाने नुकतेच निधन झाल्याचे वृत्त कळताच नांदेड लोकसभा मतदार संघांचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या निवास स्थानी भेट देऊन त्यांचे सुपुत्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे