नायगाव / बाळासाहेब पांडे
------------ --------------------
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे दिनांक ४ जून रोजी सकाळी ग्रापपंचायत कार्यालयाच्या पटांगणात शेळगाव ते कुंटूर या महामार्गाच्या रस्त्याच्या नामफलकाचे अनावरण करून नायगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेश पवार यांनी कुंटूर - बरबडा सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून दिलेल्या २४.१४ कोटी रुपये निधीच्या विविध विकासकामाचे भूमिपूजन आ. राजेश पवार ,राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे
कुंटूर येथे अंतर्गत सीसी रस्त्यासाठी ९ लक्ष , कुंटूर तांडा सभामंडप ७ लक्ष , सांगवी येथे सी.सी. रस्त्यासाठी १२ लक्ष ,सातेगाव १६ लक्ष निधी ,कृष्णूर येथे सीसी रस्त्यासाठी १४ लक्ष , तर दलित वस्तीमध्ये सी.सी. रस्त्यासाठी ९ लक्ष ,देगाव दलीतवस्ती मध्ये सी.सी. रस्त्यासाठी ८ लक्ष ,निळेगव्हाण दलीतवस्ती मध्ये सी.सी. रस्त्यासाठी ९ लक्ष ,डोंगरगाव येथे सभामंडपासाठी ८ लक्ष ,घुंगराळा सी.सी. रस्त्यासाठी ६ लक्ष ,सोमठाणा येथे सी.सी. रस्त्यासाठी २१ लाख ,हुस्सा येथे सभामंडपासाठी ११ लक्ष ,वझीरंगाव येथे सीसी रस्त्यासाठी व शाळा खोली दुरुस्ती करणेसाठी २१ लक्ष, राहेर येथे सी.सी. रस्त्यासाठी १५ लक्ष ,सावरखेड सी.सी. रस्त्यासाठी ८ लक्ष, हिप्परगा सी.सी. रस्त्यासाठी ७ लक्ष ,राणसुगाव येथे सी.सी. रस्त्यासाठी व स्मशानभूमीसाठी ८ लक्ष,धनंज येथे सी.सी. रस्त्यासाठी ६ लक्ष,पळसगाव येथे सी.सी. रस्त्यासाठी ३ लक्ष,मुस्तापूर येथे सी.सी. रस्त्यासाठी ६ लक्ष, मांडणी येथे सी.सी. रस्त्यासाठी ३ लक्ष निधी मंजूर करण्यात आला त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून कुंटूर व बरबडा सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी आ.राजेश पवार यांचे सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे.
या प्रसंगी आमदार राजेश पवार ,राजेश देशमुख कुंटूरकर ,पुनमताई पवार भाजप कार्यकारिणी सदस्यां ,सार्वजनिक बांधकाम उपअभियंता बरसकर सर , माजी.जिप.सदस्य सूर्याजी पाटील चाडकर ,माजी पंस सदस्य सूर्यकांत पाटील कदम , शिवाजी पा.होळकर ,भाजपा तालुकाध्यक्ष कोंडीबा पाटील शिंदे ,उपसभापती गजानन पाटील जुने, बाबासाहेब पाटील हंबर्डे, बांधकाम कॉन्ट्रॅक्टर मोईन शेठ करखेलीकर ,लक्ष्मण पाटील देशमुख ,अवकाश पाटील धुप्पेकर , शंकर कदम, अफरोज चौधरी ,आदींची उपस्थिती होती.भूमिपूजन सोहळ्याचे सूत्रसंचालन श्रीहरी देशमुख यांनी केले तर ,आभार सोपान कदम यांनी मानले आहे
---------------------------------------------------------------------
माजी मंत्री माजी खासदार यांच्या सुपुत्राने घातले
विकास कामांसाठी आमदाराकडे साकडे
----------------------------------------------------------------------
कुंटूर- बरबडा सर्कलचा विकास गेल्या २० वर्षापासून रखडला आहे.आतापर्यंत अनेक आमदार होऊन गेले मात्र अजूनही म्हणावा तेवढा विकास झालेला नाही. सन २०१९ मध्ये झालेल्या नायगाव विधानसभा निवडणुकीमध्ये. आ.राजेश पवार यांनी पाच हजाराची लीड पाहिजे म्हणाले होते त्याप्रमाणे भाजपा व राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कुंटूर सर्कल मधून सात हजाराच्या वर लीड दिली आहे म्हणून कुंटूर-बरबडा सर्कल चा विकास करणे ही आ.राजेश पवार यांची नैक्तिक जबाबदारी असल्याचे राजेश देशमुख कुंटूरकर यांनी व्यासपीठावरून बोलताना म्हणाले आहे
----------------------------------------------:----------------------
:- जोड रस्त्याची मागणी -- :-
-------------------------------------------------------
प्रास्ताविक मांडताना सूर्याजी पा.चाडकर असे म्हणाले कि आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आ.राजेश पवार व राजेश देशमुख कुंटूरकर हे दोन नेते एकत्र एका मनाने राहिल्यास येणाऱ्या जिप. पस.निवडणुकीत नक्कीच तीन चार उमेदवार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही असे मत सूर्याजी पाटील चाडकर यांनी व्यक्त करून माझ्या गावाजवळील असलेले राजगडनगर कडे जाणार तीन किलोमीटर अंतर असलेला जोड रस्त्याचे काम मंजूर करून देण्याची मागणीही सूर्याजी पाटील यांनी केली.
--------------------------------------------------------------------------
