अवैध रित्या रेतीच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी व ट्रक नेहमी चालू देण्यासाठी दीड लाखांची लाच मागणारा निलंग्याच्या तहसीलदार लाच स्विकारताना लातूर एसीबीच्या अधिकाऱ्यानी केला त्यांचा केला श्रीगणेशा लाच घेणे व देणे हे कायद्यानुसार गुन्हा असताना सुद्धा पैशाच्या लालसा पोटी अँटिक्रेपशन गळाला लाच खोर अधिकारी लागत असल्यामुळे निलंगा तहसीलचे तहसीलदार गणेश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले बेकायदा वाळूच्या ट्रकवर कारवाई करण्यात येऊ नये म्हणून दीड लाखांची लाच मागितली आहे
निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव यांना लातूरच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचुले आणि दीड लाखाची रिस्वतः स्विकरताना रंगे हात पकडून सदरची कारवाई केली आहे
---------------------------------------------------------------
अँटिकरेप्सन ब्युरोची दमदार कारवाई -
ही कारवाई नांदेड परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे , अप्पर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, लातूरचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधिक्षक पंडीत रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपअधिक्षक पंडीत रेजितवाड करत आहेत.
दीड लाखाची लाच घेताना अटक - लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाकडे मागील २५ मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार २६,२८,३०,३१ मे,२०२२ असे चार दिवस लाचेच्या मागणी संदर्भात चौकशी केली असता एकुण एक लाख,८० हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती अंदर की बातच्या तडजोडी दरम्यान एक लाख पन्नास हजार देण्याचे ठरले होते. यातील आरोपी लोकसेवक तहसिलदार गणेश जाधव व एजंट रमेश मोगेरगे यांनी तक्रारदार यांना वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालवू देण्यासाठी व वाळूच्या ट्रकवर या पुढे कारवाई न करण्यासाठी प्रत ट्रक
तीस हजार रुपये दोन ट्रकचे साठ हजार रुपये परत महीन्याला असे मागील तीन महिन्याचे एक लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडीच्या नंतर एक लाख पन्नास हजार रुपये ठरवून खाजगी माणस असलेल्या एजंट रमेश मोगेरगे यांच्याकडे देण्यासाठी सांगितली होते त्या प्रमाणे दिनांक ४ जून २०२२ रोजी खाजगी व्यक्ती रमेश मोगेरगे यांनी निलंगा येथे तहसीलदार यांचे घरासमोरच लाच मागणी केलेली रक्कम एक लाख पन्नास हजार रुपये पंचा समक्ष स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तहसिलदार गणेश जाधव व खाजगी व्यक्ती बरोबर सदरच्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे
