Header Ads Widget

नायगाव येथील कृषी

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीचा 

 खैरगाव येथे ग्राम सर्वेक्षण उपक्रम 



-:- बाळासाहेब पांडे -:- विशेष प्रतिनिधी नायगाव -:-

 ग्रामीण  जागृकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय नायगाव येथील विद्यार्थ्यांनी मौजै खैरगाव येथे लोकसहभागातून ग्राम सर्वेक्षण उपक्रम राबविला त्यामध्ये सर्व  विद्यार्थिनींनी ग्राम सर्वेक्षण करताना व सामाजिक नकाशा काढताना गावातील जेष्ठ नागरिक आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा सहभाग व मार्गदर्शन घेऊन त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचे स्वतःचे गाव कसे दिसते हे प्रत्यक्षात नकाशात उतरविले या नकाशात गावातील रस्ते सामाजिक सरचना घरे व वास्तव्याचा प्रकार, शाळा ,ग्रामपंचायत,मंदिर, सभाग्रह अंगणवाडी, नदी इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आला आहें 
सदरील उपक्रम राबवताना महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी गावाचा संपूर्ण अभ्यास करून गावातील लोकांच्या समस्या व त्यांची सध्याची परिस्थिती जाणून घेऊन गावातील उपस्थित असलेल्या साधन संपत्तीचा अभ्यास केला आहें 
हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी आदिती लोहट,भाग्यश्री गंधारे, अश्विनी कोठारे, मनीषा कसबे,वैष्णवी चोपडे, साईप्रसन्ना गाड्डे, हर्षदा दाइंगडे,आयुषी कुलकर्णी , माधुरी गायकवाड, नंदिनी कुलकर्णी, शुभांगी कुमरे , ऋतूजा ‌बोंदर,निकीता धोंडी, रश्मी बंकेवार, अखिला बोयापल्ली,लिखिता सोमनाथ, दिपाली भागवत, हर्षिनी दुपाटी, अश्वीनी माने, दीपिका चौधरी, राजश्री अवरूल या सर्व कृषी कन्यांनी अतिशय परिश्रम घेतले व गावचे सरपंच सय्यद मेहताब संशोधिन व उपस्थित गावकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच हा कार्यक्रम एज्युकेशन सोसायटी नायगाव चे सचिव  प्रा.श्री रवींद्र पाटील चव्हाण, संचालक श्री रमेश लवेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रमेश नादरे,कार्यक्रम समन्वयक प्रा शंकर नागणीकर, अंकुश खांड्रे, दुर्गा चाटसे विकास राठोड,कार्यक्रम अधिकारी भाग्यश्री रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी रित्या पार पडला आहें