Header Ads Widget

राज्यातली राजकीय घडामोडी कधी थंड कधी गरम राज्यकर्त्याची नाट्यमय तालीम रंगली अन थोडक्यात थंडावली ? -- आणि थंडावली पाहिजे --


नायगाव फास्ट न्यूज -:- माधव पवार -:-

राज्यात लोकसभेच्या निवडनुका असो विधान सभेच्या असो की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असो या निवडनुका जिंकून घेण्यासाठी सर्वच पक्षाचे राजकीय पुढारी राज्यात जाहीर सभेचे आयोजन करुन एकमेकावर टोलेबाजीने आखा महाराष्ट्र खळखळ करुन सोडतात त्याच पद्धतीने गेल्या पाच ते दिवसा पासून संपूर्ण राज्यच खूळ खूळ होऊन गेले महाविकास आघाडी सरकार राज्यात अस्तित्वात असल्यामुळे विरोधकाच्या पोटात पोटसूळ उठायाला लागलं ? असे असतानाच शिवसेनेचे ४६ बंडखोर आमदार शिवसेनेतुन काढता पाय काढल्यामुळे महाविकास आघाडीचे तळ्यात की मळ्यात असे द्रष्य जनतेला दिसून आले सध्या राज्यातली राजकीय परिस्थिती कधी गरम तर कधी थंड असे चित्र वास्तविकता पाहण्यासाठी तमाम जनतेला मिळत आहे
महाराष्ट्र राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशा त्रिमूर्ती पक्षाचे सरकार राज्यात एकजुटीने काम करीत असताना अचानक सरकारचा पीळ काढण्यासाठी शिवसेनेतील काही बंडखोर आमदाराचा गट बाहेर निघाला आणि राज्यात फुगवा फुगवीचे फुगे फुटायला लागले राज्य करकार खरोखर भूकंप आल्या सारखे हलायाला लागले हेच नाट्यमय परिस्थितीची तालीम विरोधक व सदरचे आमदार बाहेरून बघू लागले असताना राज्यात शिवसेनेचे कसर्यकर्ते आक्रमक होताच राज्यातील राजकीय वातावरण गरम झालेले थंडावत जाताना दिसून येत असले तरी सदरचा राजकीय तिढा अजून ही कायम असल्याचे दिसून येत असून सदरच्या आमदाराच्या घरी कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे समजते आहे