Header Ads Widget

नायगाव कडून नांदेड कडे जाणाऱ्या ट्रकने पाच ते सहा मोटर सायकलला उडवले तालुक्यातील घुंगराळा बस स्टँड जवळील घटना सुदैवाने जीवित हानी नाही

दारुड्या चालकाला नागरिकानी बसून ठेवले

माधव पवार 

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या मौजे घुंगराळा येथील छोटू साहेब हॉटेल जवळील असलेल्या बस स्टैंड वर नायगाव कडून नांदेड कडे जाणाऱ्या एका ट्रकने जाग्यावर लावून असलेल्या पाच ते सहा मोटर सायकलला उडवल्याची घटना दिनांक ३१ मे दोन हजार बावीस रोजी घुंगराळा येथे दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी घडली असून या सदरच्या घटनेत कसल्यास प्रकारची कोणती ही जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त असून सदरचा ट्रक चालक हा तळीरामाच्या वेशात म्हणजे देशी दारूच्या नशेत असल्यामुळे ही सदरची घटना घडली असून या चालकास नागरिकांनी काही काळ बसवून ठेवले आणि नंतर सोडून दिले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या घुंगराळा येथील बस स्टँडच्या साईडला एका झाडाखाली मोटर सायकली लावून काही जण हॉटेल मध्ये चहा पाणी करण्यासाठी गेले होते परंतु नायगाव कडून नांदेड कडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच सव्वीस ८७९७  जात असताना रोडच्या बाजूला लावलेल्या सहा मोटर सायकल मागून धडक दिली परंतु सुदैवाने कसल्याच प्रकारची जीवित हानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला असे नागरिकांनी सांगितले असून सदरचा ट्रक चालक देशी दारूच्या नशेत असलेल्याचें दिसून आले आहे 
घुंगराळा येथे घडलेल्या घटनेची माहिती ट्रक मालकाला देण्यात आल्याचे समजते परंतु सदरच्या चालकांना नुसते रस्त्यावर दारूच्या नशेत हुभा टाकता येत नाही अशा चालकांच्या हातात सदरच्या मालकाने लाखो रुपयाची ट्रक देऊन मोकळे झाले सदरचा चालक हा दारूच्या नशेत त्यांचे नाव चांदपाशा असे सांगितले परंतु सदरच्या चालकाचे नाव नेमके कोणते ? हे समजायला मार्ग नसला तरी सदरचा ट्रक चालक तळीराम हा घुंगराळा येथे ६ मोटर सायकला उडविला असल्याची घटना घडली असून कोणाच्या ही जीवितास धोका झाल्या नसल्याचे सदरचे व्रत प्रकाशित करण्यात येत असले तरी कुंटूर पोलिसांनी ट्रकसह चालकास ताब्यात घेऊन ठाण्याला घेऊन गेल्याचें समजते आहे