आघामी जिल्हा परिषद व पंचायत
समितीच्या निवडणूका डोळ्यासमोर
ठेवून केली निवड !!!
माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे वजीरगाव येथील रहिवासी असलेले तथा सामाजिक कार्यकर्ते हनमंतराव बालाजीराव पाटील ढगे वजीरगावकर यांची दिनांक ३१ मे २०२२ रोजी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती मांजरम जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सौ पुनमताई पवार यांच्या विशेष उपस्थितीत भाजपा सोशल मीडिया नायगाव तालुका उपाध्यक्षपदी हानमंतराव पाटील ढगे वजीरगावकर यांची निवड केली असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातून व मित्र मंडळातून अभिनंदन करण्यात येत आहे
नायगाव भाजपा तालुका अध्यक्ष कोंडीबा पाटील शिंदे, दत्ता पाटील ढगे अवकाश पाटील, प्रकाश पाटील सटवाजी मोदलवाड, भगवान ढगे आदी वेळी उपस्थित होते भाजपा शोशीयल मीडियाचे नायगाव तालुका उपाध्यक्ष हांनमतराव पाटील ढगे यांनी निवड केल्यामुळे भाजपा पक्षाचे आभार मानले आहे
तालुक्यातील वजीरगाव येथील रहिवासी असलेले हांनतराव पाटील ढगे वजीरगावकर यांनी सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम करत असल्यामुळे भाजपा रिपाईचे आमदार राजेश पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपा सोशल मीडियाच्या नायगाव तालुका उपाध्यक्ष पदी निवड केली असून आघामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपा पक्ष बळकटीसाठी हांनमंतराव पाटील ढगे यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्यासह मांजरम जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांसौ पुनमताई पवार उपस्थित होत्या यावेळी निवड करण्यात आली आहे
