नरसी : दिलीप वाघमारे
गेल्या ३५ वर्षांपासून मास्टर दिनानाथ मंगेशकर माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तथा माजी सभापतीचे प्रतिनिधी मनोहर पवार हे आज सेवानिवृत्त होत असून नायगाव तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात अन् शैक्षणिक क्षेत्रात केंद्रबिंदू असणारे पवारांचा गौरव सोहळ्याचे आयोजन मोठ्या थाटात केल्याची माहिती बालाजी मद्धेवाड यांनी दिली असून सदरील --------------
-------------------------------------------------------------------
सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खा.भास्कर पाटील खतगावकर हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे माजी शिक्षण मंत्री डी.बी सावंत, आ.अमरभाऊ राजूरकर, माजी आ.तथा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण,डॉ गोविंद नांदेडे,नंदन नांगरे,प्रशांत दिग्रसकर,यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत.
दरम्यान शैक्षणिक क्षेत्रात गेल्या ३५ वर्षांपासून यशस्वी सेवा करीत असताना त्यांनी नायगावाच्या राजकीय क्षेत्रात देखील आपल्या कार्याचे कर्तव्य सिद्ध करत सौभाग्यवती पवारांच्या माध्यमातून प्रा.मनोहर पवारांनी वेळोवेळी सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले.विशेषतः सदैव लोकाभिमुख उपक्रम राबवून वेळोवेळी सामाजिक बांधलीक जोपासूणारे पवारांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन बालाजी मद्धेवाड सह समस्त गावकरी --------
----------------------------------------------------------------
मंडळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सोमठाण येथे दिनांक १ जून रोजी दुपारी १२: ३० वाजात आयोजन केले आहे.याप्रसंगी गोंविंदराव नागेलीकर,सभापती संजय बेळगे,सौ प्रभावती कत्ते,शिवराज पा. होटाळकर श्रीनिवास चव्हाण, मारोतराव कवळे गुरुजी,संजय शेळगांवकर श्रावण पाटील भिलवंडे, संभाजी भिलवंडे, भास्कर भिलवंडे,सौ विजयताई कमठेवाड,सपोनी महादेव पुरी,गोंविंद कदम यांच्या उपस्थितीत गौरव सोहळा पार पडणार आहे
